Posts

Showing posts from September, 2026

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल; १ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी

Image
सातारा/स्पंदन एक्सप्रेस वृत्तसेवा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. बँकेच्या २१ संचालकपदांसाठी ही निवडणूक होणार असून, १ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदान, तर ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. अधिकृत निवडणूक कार्यक्रमानुसार २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची यादी १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्जांची छाननी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी निवडणूक कार्यालयात करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांची यादी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६ अशी मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २१ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे ...

शेतकरी महिलांना मिळणार २ ऑक्टोबर पासून अधिकृत प्रमाणपत्र

Image
तळमावले/राजेंद्र पुजारी यांचेकडून                महाराष्ट्र राज्यातील महिला शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात अधिकृत ओळख मिळावी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ व्हावे यासाठी राज्य शासनाने महिला शेतकरी धोरण राबवले असून येत्या २ ऑक्टोंबर पासून महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप सुरू करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्जासाठी कृषी विभागाचे अधिकृत पोर्टल कार्यान्वित झाले आहे महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ कृषी कर्ज पिक विमा कृषी निविष्ठा तसेच कृषी विभागाच्या विविध विस्तार सेवांशी जोडणे आणि त्याची अधिकृत नोंदणी करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता देण्याची तसेच त्यांचा अधिकृत डेटाबेस तयार करण्याची तरतूद केली आहे,                   या उपक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ स्वतःच्या नावावर जमीन असलेल्या महिलांपुरते प्रमाणपत्र मर्यादित राहणार नाही प्रत्यक्ष शेती करणाऱ्या तसेच शेतीशी संबंधित विविध कामांमध्ये क...

नेहरू युवा मंडळ चाहुरवाडी "आध्यात्मिक जोड आणि निसर्ग संवर्धनाचा..!!"पर्यावरणपूरक देखावा

Image
नेहरू युवा मंडळ चाहुरवाडी यांनी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदा "आध्यात्मिक जोड आणि निसर्ग संवर्धनाचा..!!"अनोखा पर्यावरणपूरक देखावा तयार केला आहे. नेहरु युवा मंडळाचे यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे या देखाव्याच्या माध्यमातून श्री गणेश मंदिरात अवतरले  श्री शंकर भगवान यांचे वहाण नंदी महाराज पाण्याची गंगा नंदीच्या मुखातून अवतरल्याचा भास होतो.  निर्झर, धबधबा, झाडे वेली फुले, पशू, पक्षी, चिमण्या, घरटी छोट्याशा जागेत निसर्गच अवतरला आहे. असा भास होतो.  संपूर्ण देखावा  म्हणजे आपल्या संस्कृती मध्ये सुर्य, चंद्र, झाडे🌲🌳🌴🌲🌳🌴 पर्वत प्राणी,  घरटी शेती  आणि पाऊस या सारख्या निसर्गातील घटकांना विशेष महत्त्व आहे. हा देखावा म्हणजे जीवन सृष्टी, निसर्ग पुजा, आणि सामुदायिक जीवनाचे प्रतिबिंब आहे.  निसर्ग हा केवळ आपल्या गरजा  भागवत नाही तर तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.  पृथ्वी ही पंचमहाभूते मिळून बनलेली आहे. निसर्ग टिकला तरच आपला टिकाव आहे. या देखाव्यातून साकारण्यात आली आहे.  या देखाव्याचे कला दिग्दर्शन  अमित पवार, सुधीर जगदाळे, विवेक लोहार...

ढेबेवाडी विभागात 'सेवा संकल्प अभियाना'स नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
  तळमावले/राजेंद्र पुजारी यांचेकडून पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील पानेरी, तळमावले आणि मंद्रूळ कोळे या परिसरात नुकतेच 'सेवा संकल्प अभियान' आणि 'विशेष मतदार नोंदणी अभियान' मोठ्या उत्साहात राबवण्यात आले. प्रशासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवलेल्या या मोहिमेला ग्रामस्थांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेदरम्यान सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री. संतोष पाटील , पाटणचे प्रांताधिकारी श्री. सोपान टोम्पे , आणि तहसीलदार श्री. अनंत गुरव यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध उपक्रमांची पाहणी केली आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मोहिमेतील प्रमुख उपक्रम व वाटप: महसूल सेवा व दाखले: पानेरी येथे नागरिकांना रेशन कार्ड, सातबारा उतारे तसेच विविध ७ प्रकारचे आवश्यक दाखले तात्काळ वितरित करण्यात आले. वारस फेरफार व सातबारा वाटप: प्रलंबित वारस नोंदींचा निपटारा करत मंद्रूळ कोळे येथील पात्र वारसांना सातबारा व फेरफार उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. विशेष लाभ: दिव्यांग बांधव तसेच भटक्या-विमुक्त जमातींच्या नागरिकांसाठी विशेष लाभ वाट...

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून गावचा विकास हा केवळ शासकीय योजनांवरच अवलंबून न राहता ग्रामस्थांची एकजूट, सामूहिक सहभाग आणि श्रमदानातूनही कसा साध्य होऊ शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील पोतेकरवाडी येथे पाहायला मिळत आहे. येथे ग्रामस्थांच्या एकजुटीतून नवीन श्रीराम मंदिराची उभारणी होत असून, त्यासाठी सुमारे २० गुंठे जागा सामूहिक सहभागातून उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रस्तावित मंदिरापर्यंत सुलभतेने पोहोचण्यासाठी सुमारे १७ फूट रुंदीचा रस्ता तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामात ग्रामस्थ, महिला मंडळ, नवतरुण मंडळ व बालमित्र मंडळाने उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतः श्रमदान केले असून, गावाच्या विकासासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या संपूर्ण उपक्रमामागे माजी सैनिक सुभेदार मेजर प्रकाश गंगाराम पोतेकर यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेली 'श्रीराम मंदिर व ग्रामविकास समिती' आणि समस्त ग्रामस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. माजी सैनिक म्हणून शिस्त, संघभावना आणि राष्ट्रसेवेची भावना त्यांनी गावाच्या विकासकार्यातही प्रत्यक्ष उतरवली आहे. पोतेकरवाडी ग्रामस्थांची...

कै. आदर्श माता यशोदा शेवाळे यांच्या स्मृती जपण्यासाठी रक्षा विसर्जनाऐवजी वृक्षारोपण

Image
कराड (प्रतिनिधी) :  येवती ता. कराड गावातील कै. आदर्श माता यशोदा महादेव शेवाळे यांच्या स्मृती अनंत काळ जपल्या जाव्यात, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी एक अनोखा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविला. पारंपरिक पद्धतीने रक्षा विसर्जन न करता, खड्डे काढून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच यशोदा शेवाळे यांच्या आठवणींना कायमस्वरूपी उजाळा देण्याचा भावनिक प्रयत्न करण्यात आला. कै. यशोदा शेवाळे यांनी आयुष्यभर कष्ट, जिद्द आणि त्यागाच्या जोरावर आपला संसार फुलविला. कुटुंबासाठी त्यांनी केलेले योगदान आणि संस्कार आजही त्यांच्या कुटुंबीयांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या रक्षा विसर्जनाऐवजी “आठवणींचा वृक्ष” जतन करण्याची संकल्पना कुटुंबीयांनी प्रत्यक्षात आणली. वृक्षारोपण केलेले हे प्रत्येक रोप भविष्यात मोठे वृक्ष बनून सावली, ऑक्सिजन आणि पर्यावरणाला आधार देईल. त्याचबरोबर त्या वृक्षांकडे पाहताना कुटुंबीयांना आपल्या प्रिय यशोदा मातेच्या आठवणी कायम जाग्या राहतील. त्यामुळे दुःखाच्या प्रसंगीही पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला आ...

सा.स्पंदन एक्सप्रेसतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन

Image
तळमावले/वार्ताहर गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण रक्षणाचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी सा.स्पंदन एक्सप्रेसच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा-स्पंदन पर्यावरणस्नेही-गणेश सन्मान 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय व ग्रंथालय यांचे सहप्रायोजकत्व आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक सजावट व उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांना पर्यावरणपूरक सजावट करणे, सजावटीमध्ये प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर टाळणे तसेच पूर्णपणे नैसर्गिक व पुनर्वार्परयोग्य साहित्याचा वापर करणे हे निकष अनिवार्य करण्यात आले आहेत. प्रत्येक सहभागी मंडळाच्या सजावटीची व देखाव्यांची माहिती आणि फोटो सा.स्पंदन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध केले जातील, तसेच सर्व सहभागी मंडळांना पर्यावरण रक्षक ई-प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. याशिवाय, उत्कृष्ट सजावट व देखावे सादर करणाऱ्या तीन मंडळांना सा.स्पंदन एक्सप्रेसच्या मुख्य पानावर विशेष स्थान आणि यूट्यूब चॅनेलवर विशेष प्रसिद्धी म...

ढेबेवाडीत केबल वायर व लोखंडी सळई चोरी करणारी टोळी जेरबंद

Image
ढेबेवाडी :            शेतकऱ्यांच्या शेतातील केबल वायर तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळया चोरी करणाऱ्या टोळी ढेबेवाडी पोलिसांनी जेरबंद केली असून, या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एकूण ३ लाख १ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री मौजे बाचोली, ता. पाटण येथे वांग नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाहून बांधकाम साहित्य चोरीला गेले होते. तसेच बांधकाम साइटवरील केबलची चोरी करण्यात आली होती. याबाबत ढेबेवाडी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसानी अवघ्या दोन तासांत  दोन आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपासात आणखी चार आरोपी निष्पन्न झाले असून त्यांनाही अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे पुढील प्रमाणे सुनील मोहन कदम (रा. कदमआवाड, मुदळकोळे, ता. पाटण), क्षितीज ऊर्फ ओंकार शिवाजी साठे (रा. सणबूर, ता. पाटण), शुभम विठ्ठल गुरव (रा. बाचोली, ता. पाटण), पवन वसंत गुरव (रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली), ओंकार सुभाष निकम (रा. बाचोली, ता. पाटण)...

जिल्हा स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कुंभारगांवच्या देसाई भगिनींची सुवर्णभरारी

Image
शरयू आणि अन्वीची विभागीय स्पर्धेसाठी निवड कराड:* सातारा स्थानिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कुंभारगांव तालुका पाटण येथील देसाई भगिनींनी अजोड कामगिरी केली आहे.  शरयू देसाई आणि अन्वी देसाई या दोन्ही बहिणींनी आपापल्या वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले आहे.  या दैदिप्यमान यशामुळे त्या सातारा जिल्ह्यात प्रथम आल्या असून, त्यांची आगामी कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय (डिव्हिजनल) तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही बहिणींच्या या यशाबद्दल त्यांचे मार्गदर्शक कोच श्री. रणजीत पाटोळे, तसेच रयत इंग्लिश मिडीयम स्कूल कराड च्या मुख्याध्यापिका व क्रीडा शिक्षक आणि वेस्ट फील्ड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराजांचा ६३ वा प्रकटदिन व श्रावण मास अनुष्ठान समाप्ती संपन्न

Image
कुंभारगांव /राजेंद्र पुजारी                पवित्र तीर्थक्षेत्र धारेश्वर मंदिर मठात श्री.ष.ब्र. राष्ट्रसंत पद्मभास्कर डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या ६३ व्या प्रकटदिनानिमित्त आणि श्रावण मास अनुष्ठान समाप्तीनिमित्त  स्वयंभू महादेवाच्या पिंडीवर बावन्नपात्री महाअभिषेक मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या धार्मिक सोहळ्यात शेकडो भाविक भक्तांनी स्वयंभू महादेवाचे व राष्ट्रसंत महास्वामी धारेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.              या प्रसंगी 'स्पंदन एक्सप्रेस'च्या वतीने शंभू महादेवाला अत्यंत प्रिय असणाऱ्या अपराजिता (गोकर्ण) फुलांच्या रोपांची भेट देऊन महाराजसाहेबांना वाढदिवसाचे अभीष्टचिंतन करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या. 'स्पंदन एक्सप्रेस' नेटवर्कचे प्रतिनिधी श्री. राजेंद्र पुजारी व सौ. माया पुजारी यांनी यावेळी महाराजसाहेबांना शाल व श्रीफळ भेट देऊन सन्मान केला. तसेच, पर्यावरणप्रेमी वृक्षमित्र श्री. जालिंदर पाटील (बनपुरी) यांच्यातर्फे तीन व पाच पानांच्या बेलाच्या कांडी रोप...

धारेश्वर येथे उद्या भव्य आरोग्य महामेळावा

Image
कुंभारगांव (राजेंद्र पुजारी):             पवित्र श्रावणमास आणि श्री धारेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्ह्याच्या वतीने श्री क्षेत्र धारेश्वर (ता. पाटण, जि. सातारा) येथे एका भव्य आरोग्य महामेळावा तथा मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ५:०० वाजेपर्यंत हे शिबिर पार पडणार आहे.           श्री ष. ब्र. प्र. १०८ पद्माभास्कर डॉ. निलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा आणि आरोग्य महामेळावा संपन्न होणार आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पाटण तालुक्याच्या वतीने या शिबिराचे नेटके आयोजन करण्यात आले असून, परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.           या महामेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मुख्य समन्वयक तथा कक्षप्रमुख मंगेश चिवटे, पश्चिम मह...

सा. 'स्पंदन एक्सप्रेस'तर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन

तळमावले (वार्ताहर): कराड येथून नियमितपणे प्रसिद्ध होत असलेल्या सा. 'स्पंदन एक्सप्रेस'तर्फे घरगुती गणपती सजावट करणाऱ्या रसिकांसाठी 'स्पंदन पर्यावरणस्नेही-गणेश सन्मान २०२६' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बाप्पाची आरास आणि निसर्गाची जपणूक यांचा सुंदर मेळ घालणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. निसर्गाचा समतोल राखून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांसाठी या स्पर्धेत सोपे निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणपूरक मूर्तीची निवड, सजावटीमध्ये प्लॅस्टिक व थर्माकोलचा शून्य वापर आणि अधिकाधिक नैसर्गिक व पुनर्रवापर योग्य साहित्याचा वापर करणे आवश्यक आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळणार असून, सर्व स्पर्धकांच्या सजावटीची माहिती आणि छायाचित्रे सा.'स्पंदन एक्सप्रेस'मध्ये प्रसिद्ध केली जातील. उत्कृष्ट सजावट करणाऱ्या विजेत्यांना साप्ताहिकाच्या मुख्य पानावरील मानाचे स्थान आणि 'स्पंदन एक्सप्रेस' या युट्यूब चॅनेलवर विशेष प्रसिद्धी दिली जाईल. तसेच, प्रत्येक सहभागीला 'पर्यावरण रक्षक ई-प्रमाणपत्र' दिले जाई...

‘बाप्पा तुझ्याचसाठी’मधून कराडच्या मातीतून बाप्पाला अनोखी मानवंदना

Image
कराड, दि. 8 : सूर्याशक्ती प्रोडक्शनच्या वतीने कराड परिसरात चित्रित केलेल्या 'बाप्पा तुझ्याचसाठी' या गाण्याचा लॉन्चिंग 10 सप्टेंबर रोजी कराडच्या टाऊन हॉल येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर या गाण्यातील मुख्य कलाकार व कराडची कन्या असलेली अभिनेत्री अश्विनी चवरे यांनी आज याबाबत माहिती दिली. या गाण्यात चवरे यांच्यासह अंकित मोहन व अन्य कलाकारांसह कराडच्या ढोल ताशा पथकातील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे. कराडच्या मातीत शूट झालेलं बाप्पाचं विशेष गाणं ‘बाप्पा तुझ्याचसाठी’ येत्या १० सप्टेंबर रोजी रसिकांच्या भेटीला येत आहे. सूर्या शक्ती प्रस्तुत या गाण्याच्या माध्यमातून गणरायाची भक्ती आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक असलेल्या ढोल-ताशा पथकाच्या जोशपूर्ण परंपरेची भव्य सांगड घालण्यात आल्याची माहिती अभिनेत्री अश्विनी चवरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे. गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमणारा ढोल-ताशांचा नाद, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा आणि बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष हे समीकरण अविभाज्य आहे. याच भावनेला केंद्रस्थानी ठेवत ‘बाप्पा तुझ्याचसाठी...

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे बोधचिन्ह भारताच्या टपाल तिकिटावर....!

Image
तळमावले (प्रतिनिधी): पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील 'स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य' या संस्थेने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आपल्या उत्तुंग कार्याची परंपरा कायम राखत आणखी एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे. भारतीय टपाल विभागाच्या (India Post) अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘माय स्टॅम्प’ (My Stamp) योजनेअंतर्गत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे अधिकृत बोधचिन्ह (लोगो) आता भारताच्या अधिकृत टपाल तिकिटावर मुद्रित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातून उगम पावलेल्या एखाद्या सामाजिक संस्थेचे बोधचिन्ह थेट भारतीय टपाल तिकिटावर झळकण्याची ही अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट ठरली आहे. विशेष म्हणजे, भारतीय टपाल खात्याच्या फिलाटेली ब्युरो, पुणे (Philately Bureau Pune H.O. 411001) कडून जारी करण्यात आलेल्या या विशेष ५ रुपयांच्या (₹5.00) टपाल तिकिटाच्या शीटवर मुंबईतील प्रसिद्ध ‘श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, प्रभादेवी’ चे छायाचित्र असून, त्याच्या जोडीला स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे बोधचिन्ह आणि 'वसा सामाजिक बांधिलकीचा' हे ब्रीदवाक्य अत्यंत आकर्षकरीत्या मुद्रित करण्यात आले आहे. हे टपाल ...

अण्णा, तुमची अशी अचानक एक्झिट चटका लावून गेली...

Image
रामचंद्र पांडुरंग डाकवे... आमचे सर्वांचे 'अण्णा'! काल अचानक तुमच्या निधनाची बातमी कानावर आली आणि काळजाचा ठोकाच चुकला. तुमची ही अशी अचानक एक्झिट मनाला भयंकर चटका लावून गेली आहे. डोळे मिटले की जुन्या आठवणींचा एक अख्खापटच डोळ्यांसमोरून तरळून जातोय. सन २०१२ ते २०१६ चा तो काळ... मी मुंबईत होतो. जुन्या हनुमान गल्लीतील तो रस्ता आणि तिथे कष्टाचे डोंगर उपसणारे तुम्ही आजही मला लख्ख आठवतात. मुंबईसारख्या मायावी शहरात, हमालीसारख्या हाडाची काडं करणाऱ्या कामात तुम्ही स्वतःला अक्षरशः झोकून दिलं होतं. अत्यंत मितभाषी, कष्टाळू आणि स्वतःच्याच विश्वात हरवलेला तुमचा तो स्वभाव. वरून एखादा कडक, राकट आणि कठोर वाटणारा माणूस, पण आतून मात्र अगदी मेणासारखा मऊ! वात्सल्याचा एक शांत झरा तुमच्या आत वाहत असायचा. त्यावेळी मुंबईच्या त्या धावपळीत तुमच्याशी खूप काही बोलता आलं नाही, पण तुमचे ते कष्टकरी हात खूप काही सांगून जायचे. कालांतराने जबाबदाऱ्या पार पडल्या. मुलींची, मुलाची लग्ने झाली आणि मुंबईचा तो धकाधकीचा रामरामोकून तुम्ही गावाकडच्या मातीत परतलात. तिथंही शांत बसला नाहीत, तर शेतीच्या कामात स्वतःला पुन्हा एकदा ...

रामचंद्र डाकवे यांचे निधन

Image
तळमावले / वार्ताहर: डाकेवाडी, काळगाव (ता. पाटण) येथील रामचंद्र पांडुरंग डाकवे यांचे शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी आकस्मिक निधन झाले. ‘अण्णा’ या नावाने ते परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन विधी सोमवार दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता डाकेवाडी, काळगाव (ता. पाटण, जि. सातारा) येथे होणार आहे. मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व हरपल्याने त्यांच्या निधनाने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

कृष्णामाई देवीच्या मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त महाप्रसाद

Image
 ढेबेवाडी/पोपटराव झेंडे                       महाराष्ट्र व कनार्टक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाईकबा देवाची जनक जननी कृष्णामाई देवीच्या मंदिरात नाईकबा च्या पायथ्याला जानुगडेवाडी ता.पाटण येथे आज श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी म्हणजे सोमवार दि.7 सप्टेंबर, रोजी सकाळी 7 वाजता मुर्तीवर अभिषेक केला जाणार इतर भक्तीमय कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी  6.00 वा महाप्रसादाचे आयोजन केल्याची माहिती जानुगडे भावकीनी दिली           या बाबत माहिती देताना वैभव व सुरज जानुगडे यांनी सांगितले की जर वर्षी मार्च एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याच्या 5 व्या दिवशी नाईकबा डोंगरमाथ्यावर सासनकाठ्या वर गुलाल खोबरे उधळण्यासाठी 2 ते 3 लाख भाविकांची गर्दी होत असते पण ज्या माऊली च्या पदस्पर्शाने नाईकबा डोंगरमाथ्यावर बनपुरी ता.पाटण च्या हद्दीत श्री नाईकबा देव स्वयंभू प्रकट झाला त्या कृष्णा माई उत्सव जर वर्षी नाईकबा च्या पायथ्याला असलेल्या जानुगडेवाडी  गावातील पायरी मार्गावर कृष्णामाई देवीच्या मंदि...

डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री काळंबादेवी भंडारा उत्सवात हजारो भाविकांची मांदियाळी

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                पाटण तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री काळंबा देवीच्या वार्षिक भंडारा उत्सव आणि अखंड हरिनाम वीणा सप्ताहाची हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सांगता झाली. काल्याचे कीर्तन, महिलांचे गोल रिंगण आणि महाप्रसादासाठी परिसरातील गावांतून भाविकांनी डोंगरावर मोठी गर्दी केली होती.                तळमावलेपासून अंदाजे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर डोंगरावर हे जागृत देवस्थान आहे. तळमावले, गुढे आणि शिद्रुकवाडी येथून वेडीवाकडी वळणे घेत तीव्र चढणीच्या घाटमार्गाने भाविक मंदिराजवळ पोहोचतात. १०-१५ वर्षांपूर्वी या ठिकाणी जाण्यासाठी केवळ पाऊलवाट होती, मात्र आता प्रवासाची सोय झाल्याने यंदा भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.                यंदाच्या काळंबादेवी भंडारा उत्सवानिमित्त २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत 'अखंड हरिनाम वीणा सप्ताहाचे' आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात राज्यभरातील अनेक नामवंत कीर्...

कराडमध्ये ३० लाखांची मोबाईल चोरी उघडकीस

Image
कराड/अनिल देसाई यांचेकडून  कराड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका मोबाईल शॉपीचे शटर तोडून तब्बल ३० लाख रुपये किमतीचे नवीन मोबाईल फोन लांबवणाऱ्या अंतरराज्यीय टोळीचा कराड शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे . या कारवाईत बंगलोर (कर्नाटक) येथून दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, न्यायालयाने त्यांना ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . २१ ऑगस्टच्या रात्री घडली होती घटना २१ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री २:०० वाजण्याच्या सुमारास फेडरल बँकेशेजारील मोबाईल शॉपीचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता . दुकानातील सुमारे ३० लाख रुपयांचे नवीन मोबाईल चोरून चोरटे पसार झाले होते . याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून (गु.र.नं. १००८/२०२६; BNS कलम ३०५, ३०५(अ), ३३१(४), ३(५)) तपास सुरू करण्यात आला होता . २५० CCTV कॅमेरे अन् तांत्रिक विश्लेषण तपासादरम्यान घटनास्थळावरील CCTV फुटेजवरून संशयित स्विफ्ट गाडी शामगाव घाट मार्गे गेल्याचे स्पष्ट झाले . तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलिसांच्या 'डी.बी.' पथकाची दोन विशेष पथके तयार करण्यात ...

कुंभारगावात १४४ व्या अखंड हरिनाम विणा सप्ताहाचा थाटात प्रारंभ

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                     पाटण  तालुक्यातील मौजे कुंभारगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व वै. येसूबुवा उर्फ साधू बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित ऐतिहासिक १४४ व्या अखंड हरिनाम विणा सप्ताहाचा प्रारंभ १ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात होत आहे. १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रंगणाऱ्या या सप्ताहाची सुरुवात १ सप्टेंबर रोजी दुपारी ३:५० ते ५:०० या शुभमुहूर्तावर कलश स्थापना करून होणार आहे.                      सन १८८३ मध्ये वै. येसूबुवा उर्फ साधू बाबा यांनी फलटण येथील ओढ्याच्या काठावर देह ठेवल्यानंतर तत्कालीन ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी या एकदिवसीय उत्सवाचे अखंड हरिनाम सप्ताहात रूपांतर केले होते. तेव्हापासून आजतागायत ही अखंड परंपरा श्रद्धेने जपली जात असून यंदा या सप्ताहाचे १४४ वे वर्ष आहे. पूर्वपार चालत आलेल्या नियमांनुसार वै. साधू बाबांचे झेंडेकरी 'कवर बुवा' यांची मानाची पताका उभारल्याशिवाय सप्ताहाची सुरुवात होत नाही.   ...