गुरुंच्या ऋणाची कृतज्ञ आठवण; श्री बाळसिद्ध विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
घोगाव : ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळे संचलित श्री बाळसिद्ध विद्यालय, घोगाव येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. यावेळी विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी महादेव साळुंखे, महादेव पाटील, सुभाष साळुंखे, उदय भंडारे, अनिल कुंभार, शोभा पाटील आणि कांता गायकवाड मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत मनोगते सादर केली. श्रेया आगंद पाटील, वैष्णवी पाटील, श्रेया सुनील पाटील, प्रणय नलवडे, सई पाटील, पायल सावंत, धनश्री पाटील, शंभुराज भेदाटे, वेदिका कांबळे, श्रेया भावके, श्रेयश भावके आणि समर्थ साळुंखे यांनी शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त केल्या. यावेळी संस्थेचे संचालक रमेश शेवाळे, शंकर पाटील, आबा तसेच कांता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना गुरुंचे महत्त्व सांगितले...