Posts

Showing posts from October, 2026

निगडे येथे नेत्र तपासणी व चष्मा वाटप संपन्न

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून  मु. निगडे (ता. पाटण, जि. सातारा) येथे यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त गावात नुकतेच एक भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर उत्साहात पार पडले. "इथं स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो" या भावनेतून आयोजित या लोककल्याणकारी शिबिराला निगडे, धनावडेवाडी आणि शिंदेवाडी परिसरातील ग्रामस्थांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.           या शिबिरामध्ये गावातील एकूण ६५ नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करून त्यांना गरजूंना चष्मा वाटप करण्यात आला. तसेच, तपासणीदरम्यान मोतीबिंदूचे निदान झालेल्या ५ रुग्णांवर पुढील उपचारासाठी लेन्स टाकून यशस्वी ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.      हे शिबिर यशस्वी करण्यासाठी निगडे गावचे सरपंच दाजी कदम, उपसरपंच आत्माराम पुजारी, आमदारसाहेबांचे सहकारी दीपक कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास गोडांबे आणि माजी उपसरपंच आनंदा मोरे यांचे मोल...

प्रस्तुती रजेचा निर्णय स्वागतार्ह; वेतनवाढ व बोनससाठी स्वराज्य संघटनेचा पाठपुरावा सुरूच – संतोष कदम

Image
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत मे. डी. एस. इंटरप्रायजेसमार्फत कार्यरत बाह्यस्रोत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या लढ्याला महत्त्वपूर्ण टप्पा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांची प्रस्तुती रजा मान्य झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, किमान वेतनवाढ, दिवाळी बोनस (सानुग्रह अनुदान) आणि इतर प्रलंबित मागण्यांबाबत अद्याप अंतिम निर्णय होणे आवश्यक आहे.           यासंदर्भात स्वराज्य संघटनेचे युवक अध्यक्ष संतोष कदम म्हणाले की, प्रस्तुती रजेचा निर्णय हा कामगारांच्या लढ्याला मिळालेला महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आणि इतर प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे.           कंत्राटी आरोग्य कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आरोग्य सेवा देण्याचे काम करतात. त्यांच्या वेतनवाढीचा आणि दिवाळी बोनसचा प्रश्नही तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांची कायमस्वरूपी सोडवणूक होईपर्यंत स्वराज्य ...

डिजिटल क्रांतीचा ग्रामीण चेहरा ! शेंडेवाडीच्या 'संतोष पवार' यांना अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीकडून 'मानद डॉक्टरेट' प्रदान

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                'इच्छा तिथे मार्ग' आणि 'सेवा हेच कार्य' या उक्तीला सार्थ ठरवत ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला डिजिटल युगाशी जोडणाऱ्या एका ध्येयवेड्या तरुणाच्या कर्तृत्वाचा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. कुंभारगाव (ता. पाटण) जवळच असलेल्या शेंडेवाडी गावचे भूमिपुत्र संतोष वनिता शामराव पवार यांना ‘लुसियाना रिसर्च युनिव्हर्सिटी, युएसए’ (USA) कडून संगणक क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कार्याबद्दल ‘मानद डॉक्टरेट’ (Honorary Doctorate) पदवी बहाल करण्यात आली आहे.                     तळमावले येथे कार्यरत असलेल्या ‘आदर्श संस्कार कॉम्प्युटर’ या शाखेच्या माध्यमातून संतोष पवार यांनी केवळ संगणक शिक्षणाचा प्रसार केला नाही, तर डिजिटल साक्षरतेचा वापर तळागाळातील नागरिकांच्या कल्याणासाठी केला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी आणि शासकीय योजनांची माहिती थेट सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे, फॉर्म भरणे, कागदपत्रांची पूर्तता करणे आणि ही कामे अत्...

शिखर शिंगणापूर ते कपिलाधार पदयात्रा ( पायी दिंडी) चे प्रस्थान

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                     कार्तिक शुद्ध ४ ते १५ शके १९४८ शुक्रवार 13 नोव्हेंबर २०२६ ते २३ नोव्हेंबर २०२६ असा बारा दिवसाच्या पायी दिंडी सोहळा संपन्न होत असून १२ नोव्हेंबर २०२६ रोजी भाविक भक्तगण यांनी शिखर शिंगणापूर मुक्कामी धारेश्वर मठ पुष्कर मठाजवळ उपस्थित राहावे या शिखर शिंगणापूर ते कपिलाधार यात्रेत श्री राष्ट्रसंत ष.ब्र.प्र.डॉ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज, डॉ.ष.ब्र.प्र.मल्लिकार्जुन शिवाचार्य धारेश्वर महाराज, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज कपिलाधार, श्री.ष.ब्र.प्र, १०८ रेवणसिद्ध शिवाचार्य परंडकर महाराज (बार्शी), राष्ट्रसंत डॉ.शिवाचार्य अहमदपूर महाराज (राजुर), उपस्थित राहून पदयात्रा (पायी दिंडी) समवेत असणार आहे.                        गेले ४०० वर्षापूर्वी पासून बार्शी ते कपिलधार पायी दिंडी जाते आहे. कार्तिक पौर्णिमेला वैकुंठ चतुर्दशी वद्य द्वितीय असा ५ दिवसाचा मन्मथ स्वामी यात्रा महोत्सव साजरा करून साक्षात मन्मथ स...

स्वच्छता दूत म्हणजे आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपणारे खरे डॉक्टर’ : दादासोा शिंगण

Image
तळमावले/राजेंद्र पुजारी यांचेकडून                आजकाल मुलांच्या वाढदिवसाला मोठे बॅनर्स, डीजे आणि अफाट बडेजाव केला जातो. परंतु, आपल्या 12 वर्षांच्या मुलाच्या वाढदिवशी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून संपूर्ण परिसराचे आरोग्य निरोगी ठेवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना ‘डॉक्टर’ मानून त्यांचा सन्मान करणारा संदीप डाकवे यांच्यासारखा बाप मी पहिल्यांदाच पाहिला आहे. कष्टाळू आणि रस्त्यावरच्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हाच खऱ्या अर्थाने वाढदिवसाचा सर्वोत्तम आशीर्वाद आहे, असे गौरवोद्गार मलकापूर नगरपरिषदेचे नगरसेवक दादासोा शिंगण यांनी काढले.                 ‘वाढदिवस आपल्या स्पंदनचा, संदेश सामाजिक बांधिलकीचा’ या उदात्त हेतूने प्रेरित होऊन डाकवे परिवाराच्या वतीने चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याच्या 12 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘स्वच्छता योद्धा सन्मान’ सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. चालू वर्षातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत अनावश्यक खर्च टाळून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट व डाकवे परिवाराने हा समाजोपयोगी उपक्र...

ढेबेवाडी येथील भर दिवसा १० तोळे चोरी करून पळालेल्या चोरट्यांना ४८ तासात ठोकल्या बेड्या

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                     ढेबेवाडी येथील मगर बंधू ज्वेलर्स या दुकानातून भर दिवसा चोरट्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानात प्रवेश करून गंठण व राणी हार खरेदी करायचा आहे असे सांगून दागिने दाखवायला लावले. दुकान मालक यांनी त्यांना वेगवेगळ्या डिझाइनचे दागिने दाखवत असताना दागिने पाहण्याकरता म्हणून ते दागिने हातात घेऊन दुकानदाराचे आपल्याकडे लक्ष नसल्याचे पाहून उभा असलेला त्याचा साथीदार त्याच्या पाठीमागे गाडीवर बसून दोघांनी दागिन्यासह दिवशी घाट रस्त्याच्या गाठ मार्गातून नवा रस्ता बाजूकडे पळून गेले होते.                     या घटनेबाबत ढेबेवाडी पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ पोलीस ठाणे पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सराफ दुकानदार विनोद मगर यांनी पोलीस ठाणे रेसर तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता. ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मार्फत तपास करून ...

'स्पंदन’ करणार स्वच्छता योद्यांचा सन्मान

Image
तळमावले/वार्ताहर ‘वाढदिवस आपल्या स्पंदनचा, संदेश सामाजिक बांधिलकीचा’ या उदात्त हेतूने स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस एका वेगळ्या सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा संकल्प डाकवे परिवाराने केला आहे. चालू वर्षातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत, चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याचा 12 वा वाढदिवस बुधवार, 21 ऑक्टोबर, 2026 रोजी अत्यंत साधेपणाने, परंतु समाजाप्रति उत्तरदायित्व जपणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाने साजरा केला जात असून, या निमित्ताने सैदापूर येथील घंटागाडी चालकांना ‘स्वच्छता योद्धा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.  यंदाच्या गणेशोत्सवात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून ‘एक अक्षरगणेशा स्वच्छतादूतांसाठी’ हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमातून जमा झालेली रक्कम आणि डाकवे परिवाराचे आर्थिक योगदान यांतून सैदापूर ग्रामपंचायतीचे घंटागाडी चालक दीपक प्रकाश रास्ते, मार्तंड अरुण रास्ते, अमीर सलीम मुल्ला, बाळू हंबीरराव पाटसुपे व यासीन कादर तांबोळी यांना स्वच्छता योद्धा प्रमाणपत्र, स्वच्छतादूत पुस्तक आणि आरोग्य व स्वच्छता साहित्य किट देऊन सन्मानित केले जाणार आहे.  यापूर...

प्रा.सचिन पुजारी यांना प्राना फाऊंडेशनचा शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान

Image
तळमावले, दि. १८ ऑक्टोबर २०२६ : शिक्षण क्षेत्रातील योगदान, सामाजिक बांधिलकी आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत प्राना फाऊंडेशन, ढेबेवाडी यांच्या वतीने काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील कनिष्ठ विभागात कार्यरत असलेले प्रा. सचिन पुजारी यांना सन २०२६ चा शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी ढेबेवाडी, ता. पाटण येथे आयोजित कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा मा. सौ. ना. डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या शुभहस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘वारसा समाजकार्याचा’ या प्रेरणादायी संकल्पनेतून प्राना फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. याच उपक्रमांतर्गत शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. सचिन पुजारी यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रा. पुजारी हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथे कनिष्ठ विभागात कार्यरत असून, संजीवन प्रतिष्ठान, कुंभारगाव या सामाजिक संस्थेचे सचिव म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. ...

स्व. इंद्रजीत अधिकराव कणसे (तात्या) यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ प्रवेशद्वार लोकार्पण

Image
पानवळवाडी (प्रतिनिधी):           कै. इंद्रजीत अधिकराव कणसे (तात्या) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या कमान/प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा आणि पुष्पांजली विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . हा कार्यक्रम सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता मु. पानवळवाडी, पो. मालदन, ता. पाटण, जि. सातारा येथे पार पडणार आहे .           स्व. इंद्रजीत कणसे (तात्या) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समस्त कणसे परिवार, मित्र मंडळी व पानवळवाडी (मालदन) येथील ग्रामस्थ मंडळाच्या वतीने नम्र अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . या प्रसंगी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन कणसे परिवार व पानवळवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे .

ढेबेवाडी बाजारपेठेत भरदिवसा ज्वेलर्समध्ये चोरी

Image
ढेबेवाडी/नितीन बेलागडे यांचेकडून      ढेबेवाडी बाजारपेठेत भरदिवसा एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरी करून चोरट्यांनी दुचाकीवरून घटनास्थळावरून पोबारा केला. त्यांचा दुकानदार तसेच काही युवकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करणाऱ्यांनाच्या डोळ्यात चटणी फेकून चोरटे  पसार होण्यात यशस्वी झाले.                  घटनास्थळावरून व मिळालेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी बाजारपेठेतील मगर बंधू ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चोरी झाली. याबाबत माहिती अशी विनोद मगर यांचे ढेबेवाडी बाजारपेठेत मगर बंधू ज्वेलर्स दुकान अनेक दिवसापासून आहे ते एक प्रतिष्ठित सोना चांदीचे दुकानदार आहेत. आज ते स्वतः त्यांचा मुलगा विराज व दोन कामगार दुकानात होते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक चोरटा चांगल्या वेषात दुकानात वस्तू घेण्याच्या बहाण्याने आला तो वस्तू हाताळत होता त्याचे दर विचारून व्हिडिओ कॉल करून कोणाला तरी दाखवत होता मगर यांचा चिरंजीव विराज त्याला वस्तू दाखवून काहीतरी लिहत होता या संधीचा फायदा घेऊन त्याने ती...

पुस्तक हातात घेऊन वाचनात जी मजा आहे ती ऑनलाईन वाचनात नाही - डॉ.संदीप डाकवे

Image
तळमावले/वार्ताहर              श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले  येथील ग्रंथालय विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने  भारताचे माजी राष्ट्रपती  डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त  वाचन प्रेरणा दिन उत्साहात  साजरा झाला. त्यानिमित्ताने समारंभाचे प्रमुख पाहुणे  डॉ. संदीप डाकवे यांनी 'डिजिटल वाचन आणि ई-बुक्स' या विषयावर बोलताना  ग्रंथ, पुस्तक हातात घेऊन वाचनात जी मजा आहे ती ऑनलाईन वाचनात निश्चितच नाही. असे प्रतिपादन केले.                            या कार्यक्रमात डॉ.संदीप डाकवे यांनी स्वतःच्या ग्रंथ संग्रहातील जवळपास 15 मौलिक  ग्रंथ महाविद्यालयाच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे मध्यवर्ती  ग्रंथालयाला भेट दिले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्रभारी प्राचार्य  प्रो. (डॉ.) उषादेवी साळुंखे होत्या.  वाचन प्...

दिलीप गणपतराव पवार यांना 'राष्ट्रीय कर्तब्यम् साहित्य पुरस्कार २०२६' जाहीर

Image
तळमावले/वार्ताहर           'इमेज इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन अँड सोशल, बिझनेस सेरिमनी, कोल्हापूर' आयोजित 'भारत कर्तब्यम् गौरवगाथा – कोल्हापूर २०२६' अंतर्गत 'कृतज्ञता सन्मान पर्व २०२६' मध्ये काळगाव येथील मा. श्री. दिलीप गणपतराव पवार यांना 'राष्ट्रीय कर्तब्यम् साहित्य पुरस्कार २०२६' जाहीर करण्यात आला आहे . विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे .           हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ०१:०० वाजता कोल्हापूर येथील 'छत्रपती शाहू स्मारक नाट्य सभागृह, दसरा चौक' येथे पार पडणार आहे .           या सोहळ्यास 'संत बाळूमामा- कलर्स मराठी' व 'जुळली गाठ- सन मराठी' फेम सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे (ज्यांनी १६० पेक्षा जास्त चित्रपट आणि ५५ पेक्षा जास्त मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करतील .       ...

कराडमध्ये 'फ्रोजो कॅफे' या नव्या दालनाचा १४ ऑक्टोबरला भव्य शुभारंभ

Image
कराड (प्रतिनिधी): कराड येथील कोयना वसाहतीतील श्री सिद्धिविनायक मंदिर रोडवर 'फ्रोजो कॅफे' या नव्या  दालनाचा भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. साई सर्जिकलपासून सुरू झालेला हा व्यवसाय सई कलेक्शन्सच्या यशस्वी टप्प्यानंतर आता 'फ्रोजो कॅफे'च्या रूपाने अधिक विस्तारत आहे. या नव्या पर्वाचा शुभारंभ बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता उत्साहात होणार आहे. रोजच्या धावपळीतून आणि थकव्यातून एक फ्रेश 'पॉज' देण्यासाठी हे कॅफे एक सुंदर व प्रसन्न ठिकाण ठरणार आहे. या कॅफेमध्ये केवळ कॉफीच नाही, तर ग्राहकांच्या आवडीचे अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत. या शुभारंभ सोहळ्यास नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून आपले प्रेम व आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ग्राहकांची उपस्थिती हीच या नव्या सुरुवातीची खरी शुभेच्छा असेल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. हे आयोजन साई सर्जिकल (वडूज), सई कलेक्शन्स (कराड) आणि फ्रोजो कॅफे (कराड) यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे.  कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी मिलिंद माळी (९९२२७७६०५०) यांच्याशी संपर्क साधण्याचे...

उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो....!

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                उदो बोला उदो, अंबाबाई माऊलीचा हो' उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो' शरद ऋतूतील नवरात्री उत्सव हा साऱ्या भाविकांच्या आस्थेचा विषय केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात देवी भक्त या उत्सवाची वाट पाहत असतात. नऊ दिवसाचा उत्सव कुलधर्म, कुलाचार, उपवास, पूजन हवन -पवन अशा विविध प्रकारे देवीची आराधना केली जाते. पंचमी अष्टमीला विशेष पूजा, खंडे नवमीला आयुध पूजा आणि दशमीला पारने आणि देवीचे सीमा ओलांडणे असे हे स्वरूप आहे. कुंभारगाव सह तळमावले, ढेबेवाडी विभागात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असून अवघं वातावरण दुर्गामय झाले आहे.                 या नवरात्र उत्सवात प्रत्येक घरामध्ये देवीचे उपवास केले जातात. विशेषतः महिला वर्गाचा यामध्ये मोठा सहभाग असतो. काही गावांमध्ये एक दिवस एक रात्र, तर काही गावांमध्ये दोन दिवस असे निरंकार उपवास केले जातात. अत्यंत कडक असे करताना महिला वर्गांची कसोटी लागते पण वृत्तधारी महिला सहजपणे हा उपवास पार पडतात....

पत्रकार भीमराव धुळप यांना ‘कला गौरव पुरस्कार’ प्रदान

Image
मुंबई : शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्याच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘शरद रत्न पुरस्कार’, तर कलाक्षेत्र, सांस्कृतिक पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना ‘कला गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेले पत्रकार, संपादक भीमराव धुळप यांना त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक कार्य आणि रुग्णसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कला गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. भीमराव धुळप यांनी पत्रकारितेबरोबरच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत यापूर्वी विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविले असून, आजपर्यंत त्या...

ढेबेवाडीत बेकायदेशीर विदेशी दारू साठा जप्त

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                     ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी एका चार चाकी वाहनातून बेकायदेशीर विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या जागेवर रंगेहात पकडले पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता गाडीच्या पाठीमागिल सीटवर आणि डिक्की मध्ये विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले. या झालेल्या कारवाईत १ लाख ५७ हजार ७६० रुपये किमतीची विदेशी दारू आणि मारुती सुझुकी LXI कार असा २ लाख ७ हजार  ७६०  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ढेबेवाडी सळवे रस्त्याकडे जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी मारुती सुझुकी एल एक्स आय दिसून आली.                ढेबेवाडी पोलिसांना या गाडीचा संशय आल्याने सदरच्या वाहनाला थांबवण्याचा इशारा केला, याबाबत गाडीतील मालाबाबत गाडी चालकाकडे विचारणा केली असता चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु ढेबेवाडी पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यावर त्यांने आपली नावे सांगितली. अक्षय सुनील कोथमिरे (रा,मंगळवार पेठ कराड) व रवींद...

शहरी आरोग्य अभियानातील 'डी. एस. इंटरप्रायझेस'च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण ३७ व्या दिवशीही सुरूच; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

मुंबई: कोरोना काळात जीवाची पर्वा न करता मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणारे शहरी आरोग्य अभियानातील 'डी. एस. इंटरप्रायझेस'चे कंत्राटी कर्मचारी आज आपल्याच हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या ३७ दिवसांपासून या कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू असून, स्वतःच्या भविष्याची आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता त्यांना सतावित आहे. मुख्य समस्या आणि मागण्या: वेतनाची अनियमितता: नियमानुसार दरमहा ७ तारखेपर्यंत होणारे वेतन अनेकदा विलंबाने दिले जाते. गेल्या महिन्यात तर हे वेतन तब्बल २५ तारखेला मिळाल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. महिला कर्मचाऱ्यांचे हाल आणि प्रसूती रजेचा प्रश्न: पालघर ते मुंबई असा लांबचा प्रवास करून महिला कर्मचारी ड्युटीवर येतात. कामाच्या ठिकाणीच महिला कर्मचाऱ्याची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटनाही समोर आली असून, प्रसूती रजेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कमी वेतनामुळे संघर्ष: घरची जबाबदारी, मुलांचे शिक्षण, आजारपण आणि वाढता खर्च यांमुळे अल्प व अनियमित वेतनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना जगणे मुश्कील झाले आहे. स्वराज्य संघटनेचा आक्रमक पवित्रा: कर्मचाऱ्यांच्या या ...

डॉ.नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजींना ‘शरद रत्न’ पुरस्कार जाहीर

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘शरद रत्न’ पुरस्कार सद्गुरु राष्ट्रसंत डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांना जाहीर झाला आहे . धर्मप्रसार, वारकरी व वीरशैव संप्रदायाचा समन्वय, संत साहित्याचा प्रचार आणि समाज प्रबोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय व अविरत कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठानतर्फे त्यांना या मानद पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे . सद्गुरु डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजींनी नेहमीच सामाजिक सलोखा, धार्मिक व अध्यात्मिक प्रबोधन आणि मानवतावादी कार्याला प्राधान्य दिले असून, त्यांच्या याच बहुमोल धार्मिक व सामाजिक योगदानामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे . हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा आगामी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे संपन्न होणार आहे . धर्मप्रेमी, वीरशैव लिंगायत तथा सदभक्त मंडळी, वारकरी, भाविक आणि सर्व स्तरांतील नागरिकांकडून सद्गुरुजींवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या सोहळ्याला मोठ्या संख्येने...

सौ.रेश्मा डाकवे यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड

Image
तळमावलेे/वार्ताहर महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार सातारा जिल्ह्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडीमध्ये पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील सौ.रेश्मा संदीप डाकवे यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली आहे. सौ.रेश्मा डाकवे ह्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव आहेत. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट गेली 10 वर्षापासून कार्यरत आहे. त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत.  या निवडीमुळे आतापर्यंत समाजाप्रती केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव झाला आहे. तसेच यामुळे समाजात काम करताना आणखी जबाबदारीने काम करावे लागेल. स्पंदन ट्रस्ट ला विविध उपक्रमांसाठी वेळोवेळी कळत नकळत मदत केलेल्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. निवडीमुळे एकप्रकारे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या कर्तृत्वावर अभिमानाची मोहोर उमटली आहे. अशी भावना सौ.रेश्मा डाकवे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.  यापूर्वी रेश्मा डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार...

‘स्पंदन’ कडून विचारांची देवाणघेवाण आणि सेवाभावी कार्याचा सन्मान- महंत आहिल्यागिरीजी महाराज

Image
तळमावले/वार्ताहर एखाद्या व्यक्तीचे खरे मोठेपण त्याच्या मृत्यूनंतरही लोक किती आठवतात आणि त्याच्या कार्याचा वारसा कसा पुढे चालवतात, यातच असते, स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांनी समाजात जे मोलाचे कार्य केले, ते आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणादायी असल्याचे मत महंत अहिल्यागिरीजी महाराज (शिवदत्त मठ, कापसेवाडी) यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संभाजीराव पाटणकर (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी), प्रदीप कांबळे (वक्ते/लेखक/कवी), डॉ.राजेंद्र कंटक (गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर), विशाल पाटील (सातारा जिल्हा प्रतिनिधी, न्यूज 18 मराठी), अमित देशमुख (उपविभागीय डाक अधिकारी, कराड पूर्व उपविभाग), गयाबाई डाकवे, डाॅ.संदीप डाकवे आदी मान्यवर उपस्थित होते साहित्य आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववानांचा गौरव करण्यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रुस्ट, महाराष्ट्र राज्य, डाकवे परिवार आणि स्पंदन एक्सप्रेसच्या सहकार्याने स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महंत अहिल्यागिरीजी महाराज पुढे बोलताना म्हणाल्या की, माणूस जन्माला येतो आणि एक दिवस निघू...