औदार्य शिवालय फाउंडेशन’ या कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन
तळमावले/वार्ताहर समाजकल्याण आणि आरोग्य सेवेचा पवित्र वसा घेऊन कार्यरत असणाऱ्या औदार्य शिवालय फाउंडेशन च्या नवीन कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ गुरुवार दि.19 मार्च,2026 रोजी मस्करवाडी (काळगांव), ता.पाटण येथे अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. ‘सेवा, समर्पण आणि समाजकल्याण’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून या फाउंडेशनने ग्रामीण भागातील जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शहरासारख्या उच्च दर्जाच्या नेत्र सेवा माफक दरात किंवा मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस फाउंडेशनने याप्रसंगी बोलून दाखवला. यावेळी फाउंडेशनचे प्रेरणास्थान माणिकराव काळे, मार्गदर्शक नारायण उपरे, खजिनदार कमलेश मस्कर, संचालक गणेश मोरे, शुभांगी देसाई, कोमल होगले उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निमंत्रक आणि फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष लक्ष्मण मारुती मस्कर, उपाध्यक्ष शिवाजी गणपती मस्कर आणि सचिव चंद्रकांत किसन मस्कर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, कराडचे उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, काळगांव ग्रामपंचायतच्या सरपंच राखी...