Posts

Showing posts from June, 2026

डाकेवाडीत पर्यावरणपूरक वटपौर्णिमा; अनिल डाकवे अन् विकास जाधव यांच्याकडून 100 वडाच्या रोपांचे वाटप

Image
तळमावले/वार्ताहर वटपौर्णिमेचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) या गावामध्ये एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. गावातील अनिल डाकवे आणि विकास जाधव यांनी एकत्र येत गावातील महिलांना तब्बल 100 वडाच्या झाडांच्या रोपट्यांचे मोफत वितरण केले. याप्रसंगी मंडलाधिकारी निकम, मंडलाधिकारी कुलकर्णी, तलाठी अक्षय लोहार, पोलीस पाटील गणेश डाकवे, शिपाई दत्ता डाकवे व गावातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या पर्यावरणपूरक पुढाकाराचे संपूर्ण परिसरातून भरभरून कौतुक होत आहे. वटपौर्णिमेला हिंदू संस्कृतीत विशेष महत्त्व असून या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. मात्र, अलीकडच्या काळात वडाची झाडे कमी होत चालली आहेत. हीच गरज ओळखून केवळ पूजा न करता निसर्गाचे रक्षण व्हावे या उद्देशाने अनिल डाकवे आणि विकास जाधव या तरुणांनी हा अनोखा संकल्प केला. गावातील महिलांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मिळालेली रोपटी आपल्या अंगणात किंवा शेतात लावून त्यांचे जतन करण्याचा संकल्प केला. केवळ वडाच्या फांदीची पूजा करण्यापेक्षा, जर प्रत्येकाने एक वडाचे झाड लावून ते जगवले त...

20 व्या आशियाई स्पर्धेकरीता भारतीय ऍथलेटिक्स संघामध्ये कुशल मोहितेची निवड

Image
तळमावले  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथे शिक्षण घेत असलेला मेहनती खेळाडू कुशल कुमार मोहिते (B.Sc.भाग 3) या विद्यार्थ्याने भुवनेश्वर या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत डेकॅथलॉन क्रीडा प्रकारामध्ये अभिमानास्पद कामगिरी करीत 7251 गुण प्राप्त केले. कुशलने  जिद्द, गुणवत्ता, कौशल्यपूर्वक अथक प्रयत्नांनी हे यश मिळविले आहे. त्याची जपान येथे होणाऱ्या 20 व्या आशियाई स्पर्धेकरिता भारतीय ऍथलेटिक्स संघामध्ये निवड होण्याचा सन्मान मिळविला आहे. ही अत्यंत गौरवास्पद  गोष्ट आहे.  कुशलच्या उल्लेखनीय यशामुळे काकासाहेब चव्हाण कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वप्नं मोठी असतील तर यशाची उंचीही मोठी असते.             श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आदरणीय  कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे तसेच संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ.) उषादेवी साळुंखे ,   विक्रांत सुपुगडे, लक्ष्मण भिंगारदिवे (शार...

शिवसमर्थ परिवारातर्फे जनसेवकाचा सन्मान

Image
  गृह रक्षक दलाचे पलटण नायक श्री. शंकर यशवंत देसाई यांचा सत्कार शिवसमर्थ परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचा आणखी एक आदर्श नमुना म्हणून गृह रक्षक दलाचे पलटण नायक श्री. शंकर यशवंत देसाई यांच्या सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. समाजातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व जनसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा शिवसमर्थ परिवाराने सातत्याने जपली असून, त्याच परंपरेचा भाग म्हणून हा सोहळा उत्साहात पार पडला. उपस्थितांनी श्री. देसाई यांच्या सेवाकार्याचा गौरव करताना शिवसमर्थ परिवाराच्या समाजाभिमुख उपक्रमांचेही विशेष कौतुक केले. सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात शिवसमर्थ परिवाराने उभे केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. समाजातील चांगल्या कार्याचा सन्मान व्हावा, सेवाभावी व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे आणि नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने शिवसमर्थ परिवार सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, हा सत्कार त्याच विचारसरणीचे प्रतीक ठरला. श्री. शंकर यशवंत देसाई यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाची निमंत्रण...

काळगावचे कविवर्य दिलीप पवार यांना 'आदर्श कविरत्न गौरव पुरस्कार' जाहीर

Image
काळगाव / प्रतिनिधी: बेडकीहाळ (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील नामांकित 'कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्था (ट्रस्ट)' च्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित 'नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड - २०२६' अंतर्गत 'राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. यामध्ये काळगाव येथील प्रख्यात कविवर्य मा. श्री. दिलीप पवार यांची 'आदर्श कविरत्न गौरव पुरस्कारा'साठी अत्यंत मानाने निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्शवत कार्य करणाऱ्या व्यक्तींना या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाते. कविवर्य दिलीप पवार यांनी साहित्य आणि काव्य क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण आणि बहुमूल्य योगदानाची दखल घेऊन संस्थेने यंदाचा हा सर्वोच्च बहुमान त्यांना बहाल केला आहे. या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप अत्यंत सन्माननीय असून, यामध्ये कोल्हापुरी फेटा, श्रीफळ, सन्मानचिन्ह, गौरव पत्र आणि मेडल यांचा समावेश आहे. कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. विक्रम बसवंत शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,...