तळमावले येथे ३ मे रोजी 'माजी विद्यार्थी स्नेहमेळावा' व 'बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार' वितरण सोहळा
तळमावले (प्रतिनिधी): येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित काकासाहेब चव्हाण कॉलेजच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने भव्य 'माजी विद्यार्थी स्नेहमेळावा' आणि 'शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार' वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता महाविद्यालयीन परिसरात संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत मा. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे भूषविणार आहेत. यावेळी संस्थेच्या सचिव डॉ. उषदेवी साळुंखे, प्राचार्य डॉ. डी. पी. कांबळे, प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील, ॲड. भरत पाटील (नाना) यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमादरम्यान शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतींना उजाळा देत, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा 'कृतज्ञता पुरस्...