सा.स्पंदन एक्सप्रेसतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन

तळमावले/वार्ताहर

गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण रक्षणाचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी सा.स्पंदन एक्सप्रेसच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा-स्पंदन पर्यावरणस्नेही-गणेश सन्मान 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि स्व.राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय व ग्रंथालय यांचे सहप्रायोजकत्व आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक सजावट व उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांना पर्यावरणपूरक सजावट करणे, सजावटीमध्ये प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर टाळणे तसेच पूर्णपणे नैसर्गिक व पुनर्वार्परयोग्य साहित्याचा वापर करणे हे निकष अनिवार्य करण्यात आले आहेत.

प्रत्येक सहभागी मंडळाच्या सजावटीची व देखाव्यांची माहिती आणि फोटो सा.स्पंदन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध केले जातील, तसेच सर्व सहभागी मंडळांना पर्यावरण रक्षक ई-प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. याशिवाय, उत्कृष्ट सजावट व देखावे सादर करणाऱ्या तीन मंडळांना सा.स्पंदन एक्सप्रेसच्या मुख्य पानावर विशेष स्थान आणि यूट्यूब चॅनेलवर विशेष प्रसिद्धी मिळण्यासोबतच आकर्षक रोप, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.

या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी 500 रुपये स्पर्धा शुल्क ठेवण्यात आले असून, इच्छुक मंडळांनी आपल्या मंडळाचे पूर्ण नाव व पत्त्यासह सजावटीचे दोन स्पष्ट फोटो, 2 मिनिटाचा व्हिडिओ आणि आपल्या सामाजिक किंवा पर्यावरणपूरक संकल्पनेची थोडक्यात माहिती संदीप डाकवे मो.9764061633, प्रतिनिधी राजेंद्र पुजारी मो.9823384536 या क्रमांकावर मंगळवार दि.22 सप्टेंबर, 2026 पर्यंत पाठवावी. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा वारसा जपण्यासाठी जास्तीत जास्त सार्वजनिक मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सा.स्पंदन एक्सप्रेसच्या वतीने संपादक संदीप डाकवे आणि टीमने केले आले आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान