हयात प्रमाणपत्र न दिल्यास पेन्शन बंद होणार - तहसीलदार अनंत गुरव

कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून

            सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधून ७२०० लाभार्थ्यांना पेन्शन दिली जाते शासन निर्णय ७ मे २०२६ अन्वये सर्व  लाभार्थ्यांना Beneficiary Satyapan App द्वारे ( डिजिटल लाइफ सर्टिफिकेट) हयात असल्याचे प्रमाणपत्र काढण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार आज अखेर ६६८७ लाभार्थ्यांनी Beneficiary Satyapan App द्वारे डिजिटल प्रमाणपत्र काढलेले आहेत.

        मात्र अद्याप ५९३ लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र काढलेली नाहीत जे  लाभार्थी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट करणार नाहीत अशा लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्यात येणार आहे असा इशारा प्रशासनाने दिला आहे तरी या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले काढलेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक तसेच महा-ई-सेवा केंद्र, तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखा मधून आयातीचे दाखले काढून घ्यावेत असे आवाहन पाटण तालुक्याचे तहसीलदार अनंत गुरव यांनी केले आहे,      

                      "कुठरे मंडळातील गुढे गावातील एक दिव्यांग एक विधवा तसेच धामणी गावातील एक दिव्यांग व दोन वृद्ध अशा एकूण पाच लाभार्थ्यांच्या हयातीच्या दाखले कामकाज २९ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत कर्मचारी सूर्यकांत पाटील यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले"

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान