डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराजांचा ६३ वा प्रकटदिन व श्रावण मास अनुष्ठान समाप्ती संपन्न


कुंभारगांव /राजेंद्र पुजारी

            पवित्र तीर्थक्षेत्र धारेश्वर मंदिर मठात श्री.ष.ब्र. राष्ट्रसंत पद्मभास्कर डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या ६३ व्या प्रकटदिनानिमित्त आणि श्रावण मास अनुष्ठान समाप्तीनिमित्त  स्वयंभू महादेवाच्या पिंडीवर बावन्नपात्री महाअभिषेक मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या धार्मिक सोहळ्यात शेकडो भाविक भक्तांनी स्वयंभू महादेवाचे व राष्ट्रसंत महास्वामी धारेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

           या प्रसंगी 'स्पंदन एक्सप्रेस'च्या वतीने शंभू महादेवाला अत्यंत प्रिय असणाऱ्या अपराजिता (गोकर्ण) फुलांच्या रोपांची भेट देऊन महाराजसाहेबांना वाढदिवसाचे अभीष्टचिंतन करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या. 'स्पंदन एक्सप्रेस' नेटवर्कचे प्रतिनिधी श्री. राजेंद्र पुजारी व सौ. माया पुजारी यांनी यावेळी महाराजसाहेबांना शाल व श्रीफळ भेट देऊन सन्मान केला. तसेच, पर्यावरणप्रेमी वृक्षमित्र श्री. जालिंदर पाटील (बनपुरी) यांच्यातर्फे तीन व पाच पानांच्या बेलाच्या कांडी रोपांची लागवड करण्यासाठी भेट देण्यात आली.

यावेळी तीर्थक्षेत्र  श्री धारेश्वर मंदिर मठाकडे जाणारा त्रिव्र चढणी चढणी घाट मार्गावर सुरक्षित कटडे व बॅरिकेट भाविक भक्तांच्या भाविक भक्तांच्या सुरक्षेतेच्या सुरक्षित दृष्टीने बसवावेत अशी मागणी भाविक भक्त, यांनी मागणी केल्याची बातमी स्पंदन एक्सप्रेस नेटवर्क  प्रसिद्ध केली होती त्या अंकाचे प्रकाशन श्री,ष, ब्र, राष्ट्रसंत पद्माभास्कर डॉ, नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी प्रतिनिधी श्री राजेंद्र पुजारी, सौ माया पुजारी, वृक्षमित्र श्री जालिंदर पाटील (बनपुरी) भाविक भक्त आदी उपस्थित होते.






Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग