Posts

Showing posts from August, 2026

अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

Image
तळमावले/(वार्ताहर) नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबवत असलेल्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वाचनसंस्कृतीचा जागर आणि साहित्याची सेवा करण्यासाठी राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार 2026 ची घोषणा करण्यात आली आहे. साहित्याच्या प्रांगणात आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून 15 लेखक आणि त्यांच्या दर्जेदार साहित्यकृतींची निवड करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डॉ.संदीप डाकवे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, आलेल्या पुस्तकांपैकी एक पुस्तक पुस्तकाचं झाड या उपक्रमासाठी वापरले जाते, दुसरे पुस्तक वाचनालयाला दिले जाते, तर तिसरे पुस्तक स्पर्धेच्या संग्रही ठेवण्यात येते. या अनोख्या उपक्रमातूनच स्व. राजाराम डाकवे (तात्या) वाचनालय आकारास येत आहे. या साहित्य पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून, या उपक्रमाला राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभला. यावर्षी स्पर्धेसाठी विविध विषयांवरील सुमारे 75 हून अधिक पुस्तके दाखल झाली होती. त्यातून परीक्षण करून अंतिम 15 मान...

जितकरवाडी-जिंती येथील दरड प्रवण क्षेत्रातील रहिवाशांचे तात्काळ पुनर्वसन करणार: तहसीलदार अनंत गुरव

Image
ढेबेवाडी प्रतिनिधी  तालुक्यातील अतिधोकादायक व दरड प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जितकरवाडी-जिंती येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी शासन प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. आज, गुरुवार दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी माननीय तहसीलदार श्री. अनंत गुरव यांनी स्थानिक ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि पुनर्वसन प्रक्रियेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलताना तहसीलदारांनी दरड प्रवण क्षेत्रात राहण्याचे भीषण धोके उपस्थितांना पटवून दिले. "ग्रामस्थांच्या जीविताचे रक्षण करणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासन नियमानुसार सर्वांना सुरक्षित ठिकाणी पक्की घरे बांधून देणार आहे," अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पाटण तालुक्यात संपादन प्रक्रिया पूर्ण होऊन मौजे आंबेघर येथे तयार झालेली नवीन घरे व तेथील पुनर्वसन प्रकल्प प्रत्यक्ष पाहण्यासाठी चितकरवाडीतील ग्रामस्थांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. तेथील काम पाहून ग्रामस्थांच्या मनातील शंकांचे निरसन होण्यास...

सायबर फसवणूक आणि वाहतूक नियमांबाबत ढेबेवाडी पोलिसांचे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन- गणेश किर्वे

Image
ढेबेवाडी : सध्याच्या डिजिटल युगात मोबाईलचा वाढता वापर आणि ऑनलाईन व्यवहारांमुळे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी गणेश किर्वे यांनी केले आहे. ते तळमावले येथील दि शिवसमर्थ मल्टी. को. आॅप. क्रे. सोसा. लि; तळमावले च्या मुख्य कार्यालयात कर्मचारी आणि अधिकारी वर्गांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसमर्थ चे सीइओ हेमंत तुपे, सरपंच सुरज चक्के आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. ओवाढते सायबर गुन्हे आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी त्यांनी नागरिकांना अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तांत्रिक मार्गदर्शन केले. युपीआय (UPI) द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज असून व्हॉट्सॲप किंवा साध्या मेसेजवर येणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा त्यावरून अज्ञात ॲप्स डाऊनलोड करू नयेत. सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांनी मोबाईलच्या फाईल मॅनेजरमध्ये जाऊन 'APK' सर्च करावे आणि कोणतीही अनोळखी फाईल आढळल्यास ती तत्काळ डिलीट करावी. यासोबतच क्रोम ब्राउझरच्या सेटिंगमध्ये जाऊ...

सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाचा विद्यार्थ्यांना दिला संदेश - प्राचार्य प्रो डॉ सतिश घाटगे

Image
तळमावले (प्रतिनिधी) :                     येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विशेष शिबिराचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रप्रेम, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकासाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.                     कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराडचे प्राचार्य (प्रो.) डॉ. सतीश घाटगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. (डॉ.) उषादेवी साळुंखे या होत्या, तर जनसहकार समुदायाचे सर्वेसर्वा मारुतीराव मोळावडे, पोलीस पाटील व पत्रकार विजय सुतार आणि पत्रकार अमोल चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.                     उद्घाटक म्हणून मा...