कृष्णामाई देवीच्या मंदिरात श्रावणी सोमवारनिमित्त महाप्रसाद


 ढेबेवाडी/पोपटराव झेंडे            

        महाराष्ट्र व कनार्टक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाईकबा देवाची जनक जननी कृष्णामाई देवीच्या मंदिरात नाईकबा च्या पायथ्याला जानुगडेवाडी ता.पाटण येथे आज श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी म्हणजे सोमवार दि.7 सप्टेंबर, रोजी सकाळी 7 वाजता मुर्तीवर अभिषेक केला जाणार इतर भक्तीमय कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी  6.00 वा महाप्रसादाचे आयोजन केल्याची माहिती जानुगडे भावकीनी दिली

        या बाबत माहिती देताना वैभव व सुरज जानुगडे यांनी सांगितले की जर वर्षी मार्च एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याच्या 5 व्या दिवशी नाईकबा डोंगरमाथ्यावर सासनकाठ्या वर गुलाल खोबरे उधळण्यासाठी 2 ते 3 लाख भाविकांची गर्दी होत असते पण ज्या माऊली च्या पदस्पर्शाने नाईकबा डोंगरमाथ्यावर बनपुरी ता.पाटण च्या हद्दीत श्री नाईकबा देव स्वयंभू प्रकट झाला त्या कृष्णा माई उत्सव जर वर्षी नाईकबा च्या पायथ्याला असलेल्या जानुगडेवाडी  गावातील पायरी मार्गावर कृष्णामाई देवीच्या मंदिरात केला जातो

        श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी हा उत्सव साजरा केला जातो या वर्षी ही आज साजरा केला जाणार असून  सकाळी  7 वाजता कृष्णामाई देवी वर  व डोंगरमाथ्यावरून आख्यायिका मध्ये सांगितले प्रमाणे मोठा आवाज करत गडगडाट करीत खाली आलेल्या व मागे वळून पाहिल्याने ती प्रचंड मोठी शिळा हाताने जागीच थांबविली त्याच जागेवरील नाईकबा देवाच्या डोंगरमाथ्यावर दर्शनासाठी 50 वर्षापासुन पायरी मार्ग जानुगडेवाडी गावातील लोकांनी केला असून त्या लगतच कृष्णामाई देवीचे मंदीर बांधले आहे त्या माऊली चे दर्शन घेतल्या शिवाय भाविक पुढे जात नाहीत

        याच कृष्णामाई माऊली चा उत्सव आज होत असून सकाळी अभिषेक झाल्यानंतर इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत त्यानंतर सायंकाळी ६ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम केल्याची माहिती जानुगडे कुटुंबियांनी दिली

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग