धारेश्वर येथे उद्या भव्य आरोग्य महामेळावा

कुंभारगांव (राजेंद्र पुजारी): 

        पवित्र श्रावणमास आणि श्री धारेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्ह्याच्या वतीने श्री क्षेत्र धारेश्वर (ता. पाटण, जि. सातारा) येथे एका भव्य आरोग्य महामेळावा तथा मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ५:०० वाजेपर्यंत हे शिबिर पार पडणार आहे.

        श्री ष. ब्र. प्र. १०८ पद्माभास्कर डॉ. निलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा आणि आरोग्य महामेळावा संपन्न होणार आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पाटण तालुक्याच्या वतीने या शिबिराचे नेटके आयोजन करण्यात आले असून, परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

        या महामेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मुख्य समन्वयक तथा कक्षप्रमुख मंगेश चिवटे, पश्चिम महाराष्ट्र सहसंचालक अनिल मोरे, कार्याध्यक्ष रामहरी राऊत, पाटण तालुका प्रमुख सौ. विद्या योगेश वायदंडे आणि उपतालुकाप्रमुख सौ. सुलताना मुबारिक हकिम यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. धारेश्वर परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी, निदान व उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग