डाकेवाडी येथे श्री दुर्गामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील आणि श्री नूतन सेवा मंडळ आणि श्री त्रिमूर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला श्री दुर्गामाता मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दोन दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात बुधवारी दुपारी माताजींच्या भव्य मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीत परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर सायंकाळी गणपती पूजन, पुण्याह वाचन, देवतार्पण आणि अग्नी स्थापना करण्यात आली. श्री दुर्गामाता मूर्तीस जलाधिवास व धान्याधिवास हे विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून स्थापित देवता पूजन, होम-हवन आणि वास्तू होम पार पडले. सकाळी १० वाजता मंत्रोच्चाराच्या जयघोषात श्री दुर्गामाता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली, तर सकाळी ११ वाजता मंदिराचे कलशारोहण संपन्न झाले. दुपारी श्री दुर्गामातेची महापूजा, आरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात महिलांस...