नेहरू युवा मंडळ चाहुरवाडी "आध्यात्मिक जोड आणि निसर्ग संवर्धनाचा..!!"पर्यावरणपूरक देखावा
नेहरू युवा मंडळ चाहुरवाडी यांनी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदा "आध्यात्मिक जोड आणि निसर्ग संवर्धनाचा..!!"अनोखा पर्यावरणपूरक देखावा तयार केला आहे.
नेहरु युवा मंडळाचे यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे या देखाव्याच्या माध्यमातून श्री गणेश मंदिरात अवतरले श्री शंकर भगवान यांचे वहाण नंदी महाराज पाण्याची गंगा नंदीच्या मुखातून अवतरल्याचा भास होतो. निर्झर, धबधबा, झाडे वेली फुले, पशू, पक्षी, चिमण्या, घरटी छोट्याशा जागेत निसर्गच अवतरला आहे. असा भास होतो.
संपूर्ण देखावा म्हणजे आपल्या संस्कृती मध्ये सुर्य, चंद्र, झाडे🌲🌳🌴🌲🌳🌴 पर्वत प्राणी, घरटी शेती आणि पाऊस या सारख्या निसर्गातील घटकांना विशेष महत्त्व आहे. हा देखावा म्हणजे जीवन सृष्टी, निसर्ग पुजा, आणि सामुदायिक जीवनाचे प्रतिबिंब आहे.
निसर्ग हा केवळ आपल्या गरजा भागवत नाही तर तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
पृथ्वी ही पंचमहाभूते मिळून बनलेली आहे. निसर्ग टिकला तरच आपला टिकाव आहे. या देखाव्यातून साकारण्यात आली आहे.
या देखाव्याचे कला दिग्दर्शन अमित पवार, सुधीर जगदाळे, विवेक लोहार, सुर्यकांत पवार, गोरख पवार, मयुर पवार, विवेक पवार आणि इतर श्रद्धावान मंडळी यांचीही मोलाची साथ आहे.
चाफळ भागातील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पवित्र वास्तव्याने गंधित असलेल्या आध्यात्मिक वारशाला टेकडयानी वेढलेल्या व निसर्ग सौंदर्याने नटलेल्या चाहुरवाडी महाराजा निसर्ग गुंफेत विराजमान झाला आहे.
आवश्य भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती..!!
जय गणेश..!!
चाहुरवाडी महाराजाचा विजय असो.
गणपती बाप्पा मोरया..!!
मंगलमूर्ती मोरया..!!
शब्दांकन = सुनिल पवार ( माजी कार्याध्यक्ष नेहरू युवा मंडळ चाहुरवाडी
Comments
Post a Comment