जिल्हा स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कुंभारगांवच्या देसाई भगिनींची सुवर्णभरारी
शरयू आणि अन्वीची विभागीय स्पर्धेसाठी निवड
कराड:*
सातारा स्थानिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कुंभारगांव तालुका पाटण येथील देसाई भगिनींनी अजोड कामगिरी केली आहे.
शरयू देसाई आणि अन्वी देसाई या दोन्ही बहिणींनी आपापल्या वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले आहे.
या दैदिप्यमान यशामुळे त्या सातारा जिल्ह्यात प्रथम आल्या असून, त्यांची आगामी कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय (डिव्हिजनल) तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दोन्ही बहिणींच्या या यशाबद्दल त्यांचे मार्गदर्शक कोच श्री. रणजीत पाटोळे, तसेच रयत इंग्लिश मिडीयम स्कूल कराड च्या मुख्याध्यापिका व क्रीडा शिक्षक आणि वेस्ट फील्ड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment