सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल; १ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी

सातारा/स्पंदन एक्सप्रेस वृत्तसेवा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. बँकेच्या २१ संचालकपदांसाठी ही निवडणूक होणार असून, १ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदान, तर ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

अधिकृत निवडणूक कार्यक्रमानुसार २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे.

दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची यादी १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्जांची छाननी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी निवडणूक कार्यालयात करण्यात येणार आहे.

छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांची यादी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.

उमेदवारी अर्ज माघारीसाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत

उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६ अशी मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

२१ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.

-------------------------------------------

१ नोव्हेंबरला मतदान

निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून छाननी, माघार आणि अंतिम उमेदवार यादीपर्यंतच्या प्रक्रियेकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

--------------------------------------------

सातारा जिल्हा बँक निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल : २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६

उमेदवारी अर्जांची यादी : १ ऑक्टोबर २०२६

अर्जांची छाननी : ५ ऑक्टोबर २०२६

वैध अर्जांची यादी : ६ ऑक्टोबर २०२६, सकाळी ११ वाजता

उमेदवारी अर्ज माघार : ६ ते २१ ऑक्टोबर २०२६

अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : २२ ऑक्टोबर २०२६

मतदान : १ नोव्हेंबर २०२६, सकाळी ८ ते सायं. ५

मतमोजणी : ३ नोव्हेंबर २०२६

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग