शेतकरी महिलांना मिळणार २ ऑक्टोबर पासून अधिकृत प्रमाणपत्र


तळमावले/राजेंद्र पुजारी यांचेकडून

            महाराष्ट्र राज्यातील महिला शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात अधिकृत ओळख मिळावी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ व्हावे यासाठी राज्य शासनाने महिला शेतकरी धोरण राबवले असून येत्या २ ऑक्टोंबर पासून महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप सुरू करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्जासाठी कृषी विभागाचे अधिकृत पोर्टल कार्यान्वित झाले आहे महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ कृषी कर्ज पिक विमा कृषी निविष्ठा तसेच कृषी विभागाच्या विविध विस्तार सेवांशी जोडणे आणि त्याची अधिकृत नोंदणी करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता देण्याची तसेच त्यांचा अधिकृत डेटाबेस तयार करण्याची तरतूद केली आहे,                  

या उपक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ स्वतःच्या नावावर जमीन असलेल्या महिलांपुरते प्रमाणपत्र मर्यादित राहणार नाही प्रत्यक्ष शेती करणाऱ्या तसेच शेतीशी संबंधित विविध कामांमध्ये कार्यरत असलेल्या पात्र महिलांना याचा लाभ मिळणार आहे उपलब्ध माहितीनुसार भाडेपट्ट्यावर शेती करणाऱ्या शेतमजूर तसेच भूमिहीन महिलांचाही या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे,                        

कृषी विभागाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या पात्र महिला शेतकऱ्यांच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती पासून महिला शेतकरी प्रमाणपत्राचे वाटप केले जाईल तरी पात्र महिलांनी ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा, श्री संतोष पाटील, पाटणचे प्रांत अधिकारी  श्री,सोपान टोम्पे तहसीलदार श्री, अनंत गुरव यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग