Posts

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ‘धगधगती मुंबई’च्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

Image
मुंबई : महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या शुभहस्ते ‘धगधगती मुंबई’च्या विशेष दिवाळी अंक २०२६ चे प्रकाशन लोकभवन येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी संपादक भीमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप आणि ओमकार धुळप उपस्थित होते. राज्यपालांच्या शुभहस्ते झालेला हा प्रकाशन सोहळा ‘धगधगती मुंबई’च्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा ठरला. अनेक दिवसांच्या नियोजनातून, अथक परिश्रमातून आणि मेहनतीतून साकारलेल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाल्याने संपादकीय टीमचा आनंद द्विगुणित झाला. या विशेषांकात नामवंत लेखक, पत्रकार आणि कवी यांचे वैविध्यपूर्ण लेख, कथा, साहित्य, राशिभविष्य, पाककृती, व्यंगचित्रे आणि मनोरंजनपर साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. वाचकांच्या पसंतीस उतरलेला हा दिवाळी विशेषांक दादर येथील आयडियल बुक डेपो, मॅजेस्टिक बुक डेपो, ठाणे येथील मॅजेस्टिक बुक डेपो तसेच राज्यातील विविध एसटी डेपोमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती संपादक भीमराव धुळप यांनी दिली.

माया मोरे यांना पहिला पाटण भूषण पुरस्कार जाहीर

Image
तळमावले/वार्ताहर                     पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात येणारा पहिला मानाचा पाटण भूषण पुरस्कार सौ.माया हणमंत मोरे यांना देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे. सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, कोल्हापुरी फेटा, तात्या पुस्तक, शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पाटणच्या भूमीतील एका दिग्गज व्यक्तिमत्त्वाला पाटण भूषण पुरस्कार देण्याचे नियोजन आहे. माया मोरे या मुळच्या मोरेवाडी (कुठरे) येथील असून सध्या त्या अलिबाग येथे उपविभागीय पोलिस अधिकारी या पदावर काम करत आहेत.                     सामाजिक जडणघडणीसाठी उल्लेखनीय योगदान देत असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड या पुरस्काराने गेली सात वर्षापासून गौरवण्यात येत आहे . या अवॉर्डने आपला स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण केला आहे. या पुरस्कार कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले आहेत...

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कृपा-आशीर्वादाने ४५ वर्षांनंतर देसाई परिवाराचा जिल्हा बँकेत प्रवेश – मंत्री शंभूराज देसाई

Image
सातारा/प्रतिनिधी लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या कृपा-आशीर्वादाने तब्बल ४५ वर्षांनंतर देसाई परिवाराचा सदस्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात दाखल झाला आहे. देसाई गटाचे दोन संचालक बँकेत निवडून आल्याने मनापासून आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सन्माननीय मतदार बंधू-भगिनींचे सर्वप्रथम मी आभार मानतो. निवडणूक लागल्यापासून माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी जी मेहनत घेतली, ठामपणे साथ दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. अनेक बाजूंनी प्रयत्न झाले. कोणत्याही गोष्टीला न जुमानता देसाई परिवारावर विश्वास ठेवून मतदारांनी आम्हाला साथ दिली.” “स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी स्थापन केलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पहिले अध्यक्षही तेच होते. त्यांच्या पश्चात आज इतक्या वर्षांनंतर देसाई परिवाराचा सदस्य बँकेत दाखल झाला आहे. स्वर्गीय शिवाजीराव देसाई साहेबांनंतर जवळपास ४५ वर्षांनी आम्ही जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे. केवळ एकटा सदस्य नव्हे, तर आमच्या गटाच्या मंगल पा...

गोशाळांना प्रतिपशू १०० रुपये चारा अनुदान द्या

Image
सातारा जिल्हा गोशाळा महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                   दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आगामी आठ महिने गोशाळांसमोर चारा टंचाईचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे . या पार्श्वभूमीवर गोशाळांमधील पशुधनाचे संगोपन करणे आर्थिकदृष्ट्या कठीण होत असल्याने शासनाने सध्या दिले जाणारे प्रतिपशू ५० रुपयांचे अनुदान वाढवून ते दररोज १०० रुपये करावे, अशी प्रमुख मागणी सातारा जिल्हा गोशाळा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .                मुख्य कार्यकारी अधिकारी गोशाळा महासंघाचे उल्हास बोराळकर व सर्व शाळा चे संचालक गोशाळा महासंघासोबत उभे राहून संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिदिन प्रति पशु १००/-रुपये अनुदान मिळावे याकरता महाराष्ट्रातील गोशाळा एकजुटीने एकत्र येऊन भविष्यात दुष्काळावर मात करू असे आंदोलन करून १०१४ नोंदणी प्रत गोशाळां साठी प्रतिदिन १००/-मिळावे अशा मागणीचे निवेदन  क्र.GM/0067/2026 रा...

सहारा सेवा आश्रमाच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव

Image
पंढरपूर/वार्ताहर                अखिल भारतीय छावा संघटना तथा छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने पंढरपूरमधील योगभवन येथे रविवारी दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता ‘भव्य शेतकरी मेळावा, छावा पुरस्कार सोहळा आणि संघटनात्मक आढावा बैठक’ अतिशय उत्साहात पार पडली.                या सोहळ्यात समाजातील दुर्लक्षित घटक, निराधार आणि गरजू दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी झटणाऱ्या संस्थांच्या कार्याची दखल घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नेज येथील 'सहारा सेवा आश्रम व पुनर्वसन केंद्र' हे सामाजिक क्षेत्रात अत्यंत मोलाचे काम करत आहे. या आश्रमाच्या माध्यमातून दिव्यांग निराधार, अनाथ व विस्थापित घटकांना आश्रय दिला जातो तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी अहोरात्र प्रयत्न केले जातात. या महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी समाजकार्याची दखल घेऊन अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने 'सहारा सेवा आश्रम व पुनर्वसन केंद्र, नेज' यांना विशेष ‘छावा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला होता.         ...

महिला बचत गटांना दिवाळीनिमित्त दिवाळी साहित्य वाटप

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                     कुंभारगाव (ता.पाटण) तालुक्यातील चोरगेवाडी, पडवळवाडी येथील श्री गणेश स्वयंसहायता महिला बचत गट व श्री बेलजाई देवी स्वयंसहायता बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू व दिवाळी साहित्य दिवाळी किट वाटपाचे आयोजन रविवार १ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री बेलजाई देवी देवीमंदिर आवारात करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रभाग व्यवस्थापक जय हिंद महिला प्रभाग संघ काळगाव च्या सौ प्रियंका प्रशांत डुबल, CRP सौ.अश्विनी कोकाटे, कुंभारगाव ग्रामपंचायतिचे मा.सरपंच अर्चना वरेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस पाटील अमित शिंदे, व्यासपीठावर शिवाजी घाडगे, स्पंदन एक्सप्रेस चे प्रतिनिधी राजेंद्र पुजारी उपस्थित होते.                 यावेळी उपस्थित बचत गटाला मार्गदर्शन करताना सातारा जिल्ह्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष व पोलिस पाटील अमित शिंदे बोलत होते. बचत गट स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाती...

निगडे येथे नेत्र तपासणी व चष्मा वाटप संपन्न

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून  मु. निगडे (ता. पाटण, जि. सातारा) येथे यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त गावात नुकतेच एक भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर उत्साहात पार पडले. "इथं स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो" या भावनेतून आयोजित या लोककल्याणकारी शिबिराला निगडे, धनावडेवाडी आणि शिंदेवाडी परिसरातील ग्रामस्थांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.           या शिबिरामध्ये गावातील एकूण ६५ नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करून त्यांना गरजूंना चष्मा वाटप करण्यात आला. तसेच, तपासणीदरम्यान मोतीबिंदूचे निदान झालेल्या ५ रुग्णांवर पुढील उपचारासाठी लेन्स टाकून यशस्वी ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.      हे शिबिर यशस्वी करण्यासाठी निगडे गावचे सरपंच दाजी कदम, उपसरपंच आत्माराम पुजारी, आमदारसाहेबांचे सहकारी दीपक कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास गोडांबे आणि माजी उपसरपंच आनंदा मोरे यांचे मोल...

प्रस्तुती रजेचा निर्णय स्वागतार्ह; वेतनवाढ व बोनससाठी स्वराज्य संघटनेचा पाठपुरावा सुरूच – संतोष कदम

Image
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत मे. डी. एस. इंटरप्रायजेसमार्फत कार्यरत बाह्यस्रोत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या लढ्याला महत्त्वपूर्ण टप्पा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांची प्रस्तुती रजा मान्य झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, किमान वेतनवाढ, दिवाळी बोनस (सानुग्रह अनुदान) आणि इतर प्रलंबित मागण्यांबाबत अद्याप अंतिम निर्णय होणे आवश्यक आहे.           यासंदर्भात स्वराज्य संघटनेचे युवक अध्यक्ष संतोष कदम म्हणाले की, प्रस्तुती रजेचा निर्णय हा कामगारांच्या लढ्याला मिळालेला महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आणि इतर प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे.           कंत्राटी आरोग्य कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आरोग्य सेवा देण्याचे काम करतात. त्यांच्या वेतनवाढीचा आणि दिवाळी बोनसचा प्रश्नही तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांची कायमस्वरूपी सोडवणूक होईपर्यंत स्वराज्य ...

डिजिटल क्रांतीचा ग्रामीण चेहरा ! शेंडेवाडीच्या 'संतोष पवार' यांना अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीकडून 'मानद डॉक्टरेट' प्रदान

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                'इच्छा तिथे मार्ग' आणि 'सेवा हेच कार्य' या उक्तीला सार्थ ठरवत ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला डिजिटल युगाशी जोडणाऱ्या एका ध्येयवेड्या तरुणाच्या कर्तृत्वाचा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. कुंभारगाव (ता. पाटण) जवळच असलेल्या शेंडेवाडी गावचे भूमिपुत्र संतोष वनिता शामराव पवार यांना ‘लुसियाना रिसर्च युनिव्हर्सिटी, युएसए’ (USA) कडून संगणक क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कार्याबद्दल ‘मानद डॉक्टरेट’ (Honorary Doctorate) पदवी बहाल करण्यात आली आहे.                     तळमावले येथे कार्यरत असलेल्या ‘आदर्श संस्कार कॉम्प्युटर’ या शाखेच्या माध्यमातून संतोष पवार यांनी केवळ संगणक शिक्षणाचा प्रसार केला नाही, तर डिजिटल साक्षरतेचा वापर तळागाळातील नागरिकांच्या कल्याणासाठी केला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी आणि शासकीय योजनांची माहिती थेट सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे, फॉर्म भरणे, कागदपत्रांची पूर्तता करणे आणि ही कामे अत्...

शिखर शिंगणापूर ते कपिलाधार पदयात्रा ( पायी दिंडी) चे प्रस्थान

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                     कार्तिक शुद्ध ४ ते १५ शके १९४८ शुक्रवार 13 नोव्हेंबर २०२६ ते २३ नोव्हेंबर २०२६ असा बारा दिवसाच्या पायी दिंडी सोहळा संपन्न होत असून १२ नोव्हेंबर २०२६ रोजी भाविक भक्तगण यांनी शिखर शिंगणापूर मुक्कामी धारेश्वर मठ पुष्कर मठाजवळ उपस्थित राहावे या शिखर शिंगणापूर ते कपिलाधार यात्रेत श्री राष्ट्रसंत ष.ब्र.प्र.डॉ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज, डॉ.ष.ब्र.प्र.मल्लिकार्जुन शिवाचार्य धारेश्वर महाराज, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज कपिलाधार, श्री.ष.ब्र.प्र, १०८ रेवणसिद्ध शिवाचार्य परंडकर महाराज (बार्शी), राष्ट्रसंत डॉ.शिवाचार्य अहमदपूर महाराज (राजुर), उपस्थित राहून पदयात्रा (पायी दिंडी) समवेत असणार आहे.                        गेले ४०० वर्षापूर्वी पासून बार्शी ते कपिलधार पायी दिंडी जाते आहे. कार्तिक पौर्णिमेला वैकुंठ चतुर्दशी वद्य द्वितीय असा ५ दिवसाचा मन्मथ स्वामी यात्रा महोत्सव साजरा करून साक्षात मन्मथ स...

स्वच्छता दूत म्हणजे आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपणारे खरे डॉक्टर’ : दादासोा शिंगण

Image
तळमावले/राजेंद्र पुजारी यांचेकडून                आजकाल मुलांच्या वाढदिवसाला मोठे बॅनर्स, डीजे आणि अफाट बडेजाव केला जातो. परंतु, आपल्या 12 वर्षांच्या मुलाच्या वाढदिवशी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून संपूर्ण परिसराचे आरोग्य निरोगी ठेवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना ‘डॉक्टर’ मानून त्यांचा सन्मान करणारा संदीप डाकवे यांच्यासारखा बाप मी पहिल्यांदाच पाहिला आहे. कष्टाळू आणि रस्त्यावरच्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हाच खऱ्या अर्थाने वाढदिवसाचा सर्वोत्तम आशीर्वाद आहे, असे गौरवोद्गार मलकापूर नगरपरिषदेचे नगरसेवक दादासोा शिंगण यांनी काढले.                 ‘वाढदिवस आपल्या स्पंदनचा, संदेश सामाजिक बांधिलकीचा’ या उदात्त हेतूने प्रेरित होऊन डाकवे परिवाराच्या वतीने चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याच्या 12 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘स्वच्छता योद्धा सन्मान’ सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. चालू वर्षातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत अनावश्यक खर्च टाळून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट व डाकवे परिवाराने हा समाजोपयोगी उपक्र...

ढेबेवाडी येथील भर दिवसा १० तोळे चोरी करून पळालेल्या चोरट्यांना ४८ तासात ठोकल्या बेड्या

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                     ढेबेवाडी येथील मगर बंधू ज्वेलर्स या दुकानातून भर दिवसा चोरट्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानात प्रवेश करून गंठण व राणी हार खरेदी करायचा आहे असे सांगून दागिने दाखवायला लावले. दुकान मालक यांनी त्यांना वेगवेगळ्या डिझाइनचे दागिने दाखवत असताना दागिने पाहण्याकरता म्हणून ते दागिने हातात घेऊन दुकानदाराचे आपल्याकडे लक्ष नसल्याचे पाहून उभा असलेला त्याचा साथीदार त्याच्या पाठीमागे गाडीवर बसून दोघांनी दागिन्यासह दिवशी घाट रस्त्याच्या गाठ मार्गातून नवा रस्ता बाजूकडे पळून गेले होते.                     या घटनेबाबत ढेबेवाडी पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ पोलीस ठाणे पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सराफ दुकानदार विनोद मगर यांनी पोलीस ठाणे रेसर तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता. ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मार्फत तपास करून ...

'स्पंदन’ करणार स्वच्छता योद्यांचा सन्मान

Image
तळमावले/वार्ताहर ‘वाढदिवस आपल्या स्पंदनचा, संदेश सामाजिक बांधिलकीचा’ या उदात्त हेतूने स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस एका वेगळ्या सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा संकल्प डाकवे परिवाराने केला आहे. चालू वर्षातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत, चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याचा 12 वा वाढदिवस बुधवार, 21 ऑक्टोबर, 2026 रोजी अत्यंत साधेपणाने, परंतु समाजाप्रति उत्तरदायित्व जपणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाने साजरा केला जात असून, या निमित्ताने सैदापूर येथील घंटागाडी चालकांना ‘स्वच्छता योद्धा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.  यंदाच्या गणेशोत्सवात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून ‘एक अक्षरगणेशा स्वच्छतादूतांसाठी’ हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमातून जमा झालेली रक्कम आणि डाकवे परिवाराचे आर्थिक योगदान यांतून सैदापूर ग्रामपंचायतीचे घंटागाडी चालक दीपक प्रकाश रास्ते, मार्तंड अरुण रास्ते, अमीर सलीम मुल्ला, बाळू हंबीरराव पाटसुपे व यासीन कादर तांबोळी यांना स्वच्छता योद्धा प्रमाणपत्र, स्वच्छतादूत पुस्तक आणि आरोग्य व स्वच्छता साहित्य किट देऊन सन्मानित केले जाणार आहे.  यापूर...

प्रा.सचिन पुजारी यांना प्राना फाऊंडेशनचा शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान

Image
तळमावले, दि. १८ ऑक्टोबर २०२६ : शिक्षण क्षेत्रातील योगदान, सामाजिक बांधिलकी आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत प्राना फाऊंडेशन, ढेबेवाडी यांच्या वतीने काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील कनिष्ठ विभागात कार्यरत असलेले प्रा. सचिन पुजारी यांना सन २०२६ चा शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी ढेबेवाडी, ता. पाटण येथे आयोजित कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा मा. सौ. ना. डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या शुभहस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘वारसा समाजकार्याचा’ या प्रेरणादायी संकल्पनेतून प्राना फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. याच उपक्रमांतर्गत शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. सचिन पुजारी यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रा. पुजारी हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथे कनिष्ठ विभागात कार्यरत असून, संजीवन प्रतिष्ठान, कुंभारगाव या सामाजिक संस्थेचे सचिव म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. ...

स्व. इंद्रजीत अधिकराव कणसे (तात्या) यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ प्रवेशद्वार लोकार्पण

Image
पानवळवाडी (प्रतिनिधी):           कै. इंद्रजीत अधिकराव कणसे (तात्या) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या कमान/प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा आणि पुष्पांजली विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . हा कार्यक्रम सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता मु. पानवळवाडी, पो. मालदन, ता. पाटण, जि. सातारा येथे पार पडणार आहे .           स्व. इंद्रजीत कणसे (तात्या) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समस्त कणसे परिवार, मित्र मंडळी व पानवळवाडी (मालदन) येथील ग्रामस्थ मंडळाच्या वतीने नम्र अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . या प्रसंगी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन कणसे परिवार व पानवळवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे .

ढेबेवाडी बाजारपेठेत भरदिवसा ज्वेलर्समध्ये चोरी

Image
ढेबेवाडी/नितीन बेलागडे यांचेकडून      ढेबेवाडी बाजारपेठेत भरदिवसा एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरी करून चोरट्यांनी दुचाकीवरून घटनास्थळावरून पोबारा केला. त्यांचा दुकानदार तसेच काही युवकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करणाऱ्यांनाच्या डोळ्यात चटणी फेकून चोरटे  पसार होण्यात यशस्वी झाले.                  घटनास्थळावरून व मिळालेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी बाजारपेठेतील मगर बंधू ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चोरी झाली. याबाबत माहिती अशी विनोद मगर यांचे ढेबेवाडी बाजारपेठेत मगर बंधू ज्वेलर्स दुकान अनेक दिवसापासून आहे ते एक प्रतिष्ठित सोना चांदीचे दुकानदार आहेत. आज ते स्वतः त्यांचा मुलगा विराज व दोन कामगार दुकानात होते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक चोरटा चांगल्या वेषात दुकानात वस्तू घेण्याच्या बहाण्याने आला तो वस्तू हाताळत होता त्याचे दर विचारून व्हिडिओ कॉल करून कोणाला तरी दाखवत होता मगर यांचा चिरंजीव विराज त्याला वस्तू दाखवून काहीतरी लिहत होता या संधीचा फायदा घेऊन त्याने ती...

पुस्तक हातात घेऊन वाचनात जी मजा आहे ती ऑनलाईन वाचनात नाही - डॉ.संदीप डाकवे

Image
तळमावले/वार्ताहर              श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले  येथील ग्रंथालय विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने  भारताचे माजी राष्ट्रपती  डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त  वाचन प्रेरणा दिन उत्साहात  साजरा झाला. त्यानिमित्ताने समारंभाचे प्रमुख पाहुणे  डॉ. संदीप डाकवे यांनी 'डिजिटल वाचन आणि ई-बुक्स' या विषयावर बोलताना  ग्रंथ, पुस्तक हातात घेऊन वाचनात जी मजा आहे ती ऑनलाईन वाचनात निश्चितच नाही. असे प्रतिपादन केले.                            या कार्यक्रमात डॉ.संदीप डाकवे यांनी स्वतःच्या ग्रंथ संग्रहातील जवळपास 15 मौलिक  ग्रंथ महाविद्यालयाच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे मध्यवर्ती  ग्रंथालयाला भेट दिले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्रभारी प्राचार्य  प्रो. (डॉ.) उषादेवी साळुंखे होत्या.  वाचन प्...

दिलीप गणपतराव पवार यांना 'राष्ट्रीय कर्तब्यम् साहित्य पुरस्कार २०२६' जाहीर

Image
तळमावले/वार्ताहर           'इमेज इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन अँड सोशल, बिझनेस सेरिमनी, कोल्हापूर' आयोजित 'भारत कर्तब्यम् गौरवगाथा – कोल्हापूर २०२६' अंतर्गत 'कृतज्ञता सन्मान पर्व २०२६' मध्ये काळगाव येथील मा. श्री. दिलीप गणपतराव पवार यांना 'राष्ट्रीय कर्तब्यम् साहित्य पुरस्कार २०२६' जाहीर करण्यात आला आहे . विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे .           हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ०१:०० वाजता कोल्हापूर येथील 'छत्रपती शाहू स्मारक नाट्य सभागृह, दसरा चौक' येथे पार पडणार आहे .           या सोहळ्यास 'संत बाळूमामा- कलर्स मराठी' व 'जुळली गाठ- सन मराठी' फेम सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे (ज्यांनी १६० पेक्षा जास्त चित्रपट आणि ५५ पेक्षा जास्त मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करतील .       ...

कराडमध्ये 'फ्रोजो कॅफे' या नव्या दालनाचा १४ ऑक्टोबरला भव्य शुभारंभ

Image
कराड (प्रतिनिधी): कराड येथील कोयना वसाहतीतील श्री सिद्धिविनायक मंदिर रोडवर 'फ्रोजो कॅफे' या नव्या  दालनाचा भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. साई सर्जिकलपासून सुरू झालेला हा व्यवसाय सई कलेक्शन्सच्या यशस्वी टप्प्यानंतर आता 'फ्रोजो कॅफे'च्या रूपाने अधिक विस्तारत आहे. या नव्या पर्वाचा शुभारंभ बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता उत्साहात होणार आहे. रोजच्या धावपळीतून आणि थकव्यातून एक फ्रेश 'पॉज' देण्यासाठी हे कॅफे एक सुंदर व प्रसन्न ठिकाण ठरणार आहे. या कॅफेमध्ये केवळ कॉफीच नाही, तर ग्राहकांच्या आवडीचे अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत. या शुभारंभ सोहळ्यास नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून आपले प्रेम व आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ग्राहकांची उपस्थिती हीच या नव्या सुरुवातीची खरी शुभेच्छा असेल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. हे आयोजन साई सर्जिकल (वडूज), सई कलेक्शन्स (कराड) आणि फ्रोजो कॅफे (कराड) यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे.  कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी मिलिंद माळी (९९२२७७६०५०) यांच्याशी संपर्क साधण्याचे...

उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो....!

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                उदो बोला उदो, अंबाबाई माऊलीचा हो' उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो' शरद ऋतूतील नवरात्री उत्सव हा साऱ्या भाविकांच्या आस्थेचा विषय केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात देवी भक्त या उत्सवाची वाट पाहत असतात. नऊ दिवसाचा उत्सव कुलधर्म, कुलाचार, उपवास, पूजन हवन -पवन अशा विविध प्रकारे देवीची आराधना केली जाते. पंचमी अष्टमीला विशेष पूजा, खंडे नवमीला आयुध पूजा आणि दशमीला पारने आणि देवीचे सीमा ओलांडणे असे हे स्वरूप आहे. कुंभारगाव सह तळमावले, ढेबेवाडी विभागात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असून अवघं वातावरण दुर्गामय झाले आहे.                 या नवरात्र उत्सवात प्रत्येक घरामध्ये देवीचे उपवास केले जातात. विशेषतः महिला वर्गाचा यामध्ये मोठा सहभाग असतो. काही गावांमध्ये एक दिवस एक रात्र, तर काही गावांमध्ये दोन दिवस असे निरंकार उपवास केले जातात. अत्यंत कडक असे करताना महिला वर्गांची कसोटी लागते पण वृत्तधारी महिला सहजपणे हा उपवास पार पडतात....