प्रा.सचिन पुजारी यांना प्राना फाऊंडेशनचा शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान

तळमावले, दि. १८ ऑक्टोबर २०२६ : शिक्षण क्षेत्रातील योगदान, सामाजिक बांधिलकी आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत प्राना फाऊंडेशन, ढेबेवाडी यांच्या वतीने काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील कनिष्ठ विभागात कार्यरत असलेले प्रा. सचिन पुजारी यांना सन २०२६ चा शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी ढेबेवाडी, ता. पाटण येथे आयोजित कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा मा. सौ. ना. डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या शुभहस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

‘वारसा समाजकार्याचा’ या प्रेरणादायी संकल्पनेतून प्राना फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. याच उपक्रमांतर्गत शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. सचिन पुजारी यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रा. पुजारी हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथे कनिष्ठ विभागात कार्यरत असून, संजीवन प्रतिष्ठान, कुंभारगाव या सामाजिक संस्थेचे सचिव म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या प्रा. पुजारी यांच्या कार्याचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक मा. श्री. भरत पाटील (नाना), महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सदस्य मा. श्री. सत्यजितसिंह पाटणकर (दादा), सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मा. श्री. हिंदुराव पाटील (बापू), प्राना फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मा. सौ. डॉ. प्राचीताई पाटील, भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव मा. सौ. कविताताई कचरे, भाजपाचे पाटण तालुका मंडळ अध्यक्ष मा. श्री. गणेश यादव यांच्यासह प्राना फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच वांग खोऱ्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रांतील मान्यवर आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रा. सचिन पुजारी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कौस्तुभ गावडे, माजी सहसचिव (अर्थ) मा. श्री. एस. के. कुंभार, माजी सहसचिव (प्रशासन) मा. श्री. आर. के. भोसले, काकासाहेब चव्हाण कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या प्रो. डॉ. उषादेवी साळुंखे तसेच सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती मा. श्री. संजय देसाई यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान म्हणजे प्रा. सचिन पुजारी यांच्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीला मिळालेली प्रेरणादायी पावती आहे. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या यशाबद्दल सहकारी, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान