डिजिटल क्रांतीचा ग्रामीण चेहरा ! शेंडेवाडीच्या 'संतोष पवार' यांना अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीकडून 'मानद डॉक्टरेट' प्रदान
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून
'इच्छा तिथे मार्ग' आणि 'सेवा हेच कार्य' या उक्तीला सार्थ ठरवत ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला डिजिटल युगाशी जोडणाऱ्या एका ध्येयवेड्या तरुणाच्या कर्तृत्वाचा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. कुंभारगाव (ता. पाटण) जवळच असलेल्या शेंडेवाडी गावचे भूमिपुत्र संतोष वनिता शामराव पवार यांना ‘लुसियाना रिसर्च युनिव्हर्सिटी, युएसए’ (USA) कडून संगणक क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कार्याबद्दल ‘मानद डॉक्टरेट’ (Honorary Doctorate) पदवी बहाल करण्यात आली आहे.
तळमावले येथे कार्यरत असलेल्या ‘आदर्श संस्कार कॉम्प्युटर’ या शाखेच्या माध्यमातून संतोष पवार यांनी केवळ संगणक शिक्षणाचा प्रसार केला नाही, तर डिजिटल साक्षरतेचा वापर तळागाळातील नागरिकांच्या कल्याणासाठी केला. केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी आणि शासकीय योजनांची माहिती थेट सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे, फॉर्म भरणे, कागदपत्रांची पूर्तता करणे आणि ही कामे अत्यंत पारदर्शक व जाणीवपूर्वक पूर्ण करणे, ही त्यांची कामाची पद्धत संपूर्ण परिसरात कौतुकास्पद ठरली आहे. शासकीय योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे.
Comments
Post a Comment