शिखर शिंगणापूर ते कपिलाधार पदयात्रा ( पायी दिंडी) चे प्रस्थान


कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून

                कार्तिक शुद्ध ४ ते १५ शके १९४८ शुक्रवार 13 नोव्हेंबर २०२६ ते २३ नोव्हेंबर २०२६ असा बारा दिवसाच्या पायी दिंडी सोहळा संपन्न होत असून १२ नोव्हेंबर २०२६ रोजी भाविक भक्तगण यांनी शिखर शिंगणापूर मुक्कामी धारेश्वर मठ पुष्कर मठाजवळ उपस्थित राहावे या शिखर शिंगणापूर ते कपिलाधार यात्रेत श्री राष्ट्रसंत ष.ब्र.प्र.डॉ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज, डॉ.ष.ब्र.प्र.मल्लिकार्जुन शिवाचार्य धारेश्वर महाराज, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज कपिलाधार, श्री.ष.ब्र.प्र, १०८ रेवणसिद्ध शिवाचार्य परंडकर महाराज (बार्शी), राष्ट्रसंत डॉ.शिवाचार्य अहमदपूर महाराज (राजुर), उपस्थित राहून पदयात्रा (पायी दिंडी) समवेत असणार आहे.                     गेले ४०० वर्षापूर्वी पासून बार्शी ते कपिलधार पायी दिंडी जाते आहे. कार्तिक पौर्णिमेला वैकुंठ चतुर्दशी वद्य द्वितीय असा ५ दिवसाचा मन्मथ स्वामी यात्रा महोत्सव साजरा करून साक्षात मन्मथ स्वामींना झालेल्या शिवपार्वती दर्शनाचा आनंद साजरा केला जात असे. अलीकडे 96 ते 99 वर्षापासून अहमदपूर महाराज, साखर खर्डेकर महाराज, वसमतकर महाराज आदी अनेक शिवाचार्यांनी आपापल्या परिसरातील भाविक भक्त पदयात्रा आयोजित केल्या. त्या आजपर्यंत अविरत सुरू आहेत सध्या २५० पेक्षा जास्त आणि लाखो पदयात्रा भक्तजन कपिलाधारला येतात आणि कार्तिक दर्शन योग अर्थात मन्मथ स्वामींना झालेला साक्षात्कार योग साधण्याचा प्रयत्न करताना अनेकांना दांपत्य, एकादशी तरुण ब्रह्मचारी येऊन भेटून जातो. 

        पदयात्रेबद्दल किंवा कोणत्याही दिंडी बाबत विचारणा करतो परंतु विचारणा केलेल्याला पुन्हा पाहिल्यास तो दिसत नाही असे साक्षात्कार झालेले शेकडो भक्तगण अविरतपणे पदयात्रा करीत आहे कपिलाधार ते पंढरपूर मार्गे शिखर शिंगणापूर अशी मन्मथ स्वामी पदयात्रा करीत असेल मला शंभू देवाचे पुष्कर तळ्यातील तीर्थ लाभावी असा दृष्टांत धारेश्वर मठाधिपती मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांना १९६३ साली झाला. तेव्हापासून धारेश्वर आणि शिखर शिंगणापुरातील जलतीर्थ घेऊन बार्शी ते कपिलाधार यात्रेत जात असतात त्यास आज ६७ वर्षे झाली आहेत यावर्षी गुरुवर्य श्री ष.ब्र, प्र.नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराजांच्या सानिध्यात शिखर शिंगणापूर ते कपिलधार पदयात्रेचे प्रस्थान होत आहे. तरी सदभक्तांनी शारीरिक  सौख्य, मनोबल, वाढवून निसर्गानंद व भजन प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून आनंदकर या पदयात्रेत बहुसंख्येने सहभागी व्हावे आणि अनेक गावातून दरवर्षी या पदयात्रेत दरवर्षी भक्तगणांची वाढ होत असून अनेक भक्तगण शिखर शिंगणापूर पासून संपूर्ण जवळच्या गावातून सहभागी होऊन कार्तिक स्वामीचा अवतार अशा संत शिरोमणी मन्मथ स्वामी समाधी दर्शन शेकडो शिवाचार्य व हजारो साहित्य साठी कारंडेवाडी कर वाहनाची सोय करतात.

        गुरुवार १२ नोव्हेंबर २०२६ रोजी शिखर शिंगणापूर या ठिकाणी भाविक भक्तगण यांनी उपस्थित रहावे 13  नोव्हेंबर २०२६ सकाळी शिंगणापूर मठ, दुपारी  नातेपुते, रात्री धन्य निरंकारी मंडप कळंबोली,       

१४ नोव्हेंबर सकाळ दहिगाव, दुपार पिरळे, रात्री कळंबोली,                           

१५ नोव्हेंबर सकाळ रणगाव तालुका इंदापूर दुपार गोतंडी पुणे रात्री राझनी,                               

१६ नोव्हेंबर सकाळ सोनाई दूध संघ इंदापूर,दुपार सरडेवाडी रात्री करण्यात मंदिर रांझनी,                        

१७ नोव्हेंबर सकाळ शिराळे दुपार गणपतीचे अकोले रात्री उत्तरेश्वर मंदिर,                                

१८ नंबर सकाळ दत्त मंदिर गगनगिरी आश्रम रोपळे, दुपार गोंडगे वस्ती शाळा रात्री विठ्ठल मंदिर मुंगशी,            

१९ नोव्हेंबर पांडकर महाराज मठ परंडा दुपारी पिंपरखेड रात्री कुंभेफळ हनुमान भवानी मंदिर,                

२० नोव्हेंबर सकाळी साकत तलाव दुपारी रात्री चांगदेव मठ,                        

२१ नोव्हेंबर सकाळ,  दुपार,वैजनाथ मंदिर पाथरूड रात्री सिद्धेश्वर मंदिर धाराशिव,                   

२२ नोव्हेंबर सकाळ हनुमंत पुरी आनंदनगर दुपारी पारगाव बार्शी, रात्री सौसा ळा,                                    

२३ नोव्हेंबर काटकर वस्ती वाणगाव दुपारी पारगाव (बार्शी व बामणी दिंडी भेट) रात्री कपिलाधार संत मन्मथ स्वामी समाधी दर्शन,                                  

२४ नोव्हेंबर २०२६ मन्मथ स्वामी यात्रा महोत्सव व वीरशैव मेळावा कपिलाधार तालुका जिल्हा बीड येथे होणार आहे.








Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान