महिला बचत गटांना दिवाळीनिमित्त दिवाळी साहित्य वाटप

कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून

                कुंभारगाव (ता.पाटण) तालुक्यातील चोरगेवाडी, पडवळवाडी येथील श्री गणेश स्वयंसहायता महिला बचत गट व श्री बेलजाई देवी स्वयंसहायता बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू व दिवाळी साहित्य दिवाळी किट वाटपाचे आयोजन रविवार १ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री बेलजाई देवी देवीमंदिर आवारात करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रभाग व्यवस्थापक जय हिंद महिला प्रभाग संघ काळगाव च्या सौ प्रियंका प्रशांत डुबल, CRP सौ.अश्विनी कोकाटे, कुंभारगाव ग्रामपंचायतिचे मा.सरपंच अर्चना वरेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस पाटील अमित शिंदे, व्यासपीठावर शिवाजी घाडगे, स्पंदन एक्सप्रेस चे प्रतिनिधी राजेंद्र पुजारी उपस्थित होते.

             यावेळी उपस्थित बचत गटाला मार्गदर्शन करताना सातारा जिल्ह्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष व पोलिस पाटील अमित शिंदे बोलत होते. बचत गट स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ग्रामीण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना विशेषतः महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा उद्देश आहे. महिला वर्गामध्ये आर्थिक बचत करण्याची सवय निर्माण व्हावी बचत गटाच्या माध्यमातून कमी व्याजाने कर्ज मिळवून देणे यामुळे सावकाराच्या कर्जाच्या जाळ्यातून सुटका व्हावी कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी लघुउद्योग शेती पूरक व्यवसाय किंवा स्वयं रोजगार सुरू करण्यात बचत गटाची मदत होते. महिलांना एकत्र आणून त्यांना आर्थिक निर्णय क्षमतेमध्ये सहभागी करून समाजात सन्मान मिळवून त्यांचा कौशल्य विकास, व्यवसाय व्यवस्थापन आणि विविध प्रकारचे तांत्रिक व व्यवहारिक प्रशिक्षण देणे सामाजिक एकता आपत्कालीन परिस्थितीत किंवा सामाजिक प्रश्नावर एकत्र येऊन एकमेकांना मदत करणे आणि सामूहिक सामर्थ्य वाढवणे बचत गट (स्वयं सहाय्य) गटांनी एकत्र येऊन नियमित बचत अंतर्गत कर्ज वाटप आणि पारदर्शक आर्थिक शिस्त पाळणे आवश्यक आहे, तसेच श्री गणेश  स्वयंसहाय्यता व श्री बेलजाई देवी स्वयं सहायता महिला बचत गट चोरगेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू समारंभ दिवाळी साहित्य किट वाटपाचे आयोजन केले हा उपक्रम भविष्यात प्रेरणादायी ठरेल.


         कार्यक्रमासाठी बचत गटातील महिला वर्ग उपस्थित होता. यावेळी दिवाळी साहित्याची किट बचत गटातील महिलांना वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व बचत गटातील महिलांना स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते . हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास नागरी पतसंस्थेचे तळमावले शाखेचे व्यवस्थापक आनंदा चोरगे (साहेब), बाळासो चोरगे, अशोक विठ्ठल चोरगे, रामचंद्र गणपत वाघ, चंद्रकांत यशवंत चोरगे, खाशाबा विठ्ठल चोरगे, योगेश खशाबा वाघ , महेश मारुती भातभके, ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश दिलवाले यांनी  मानले.



Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान