दिलीप गणपतराव पवार यांना 'राष्ट्रीय कर्तब्यम् साहित्य पुरस्कार २०२६' जाहीर
तळमावले/वार्ताहर
'इमेज इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन अँड सोशल, बिझनेस सेरिमनी, कोल्हापूर' आयोजित 'भारत कर्तब्यम् गौरवगाथा – कोल्हापूर २०२६' अंतर्गत 'कृतज्ञता सन्मान पर्व २०२६' मध्ये काळगाव येथील मा. श्री. दिलीप गणपतराव पवार यांना 'राष्ट्रीय कर्तब्यम् साहित्य पुरस्कार २०२६' जाहीर करण्यात आला आहे. विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ०१:०० वाजता कोल्हापूर येथील 'छत्रपती शाहू स्मारक नाट्य सभागृह, दसरा चौक' येथे पार पडणार आहे.
या सोहळ्यास 'संत बाळूमामा- कलर्स मराठी' व 'जुळली गाठ- सन मराठी' फेम सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रकाश धोत्रे (ज्यांनी १६० पेक्षा जास्त चित्रपट आणि ५५ पेक्षा जास्त मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करतील.
आयोजन समितीने श्री. दिलीप पवार यांना सहपरिवर उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले असून, त्यांच्या या यशाबद्दल आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत
Comments
Post a Comment