ढेबेवाडी येथील भर दिवसा १० तोळे चोरी करून पळालेल्या चोरट्यांना ४८ तासात ठोकल्या बेड्या
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून
ढेबेवाडी येथील मगर बंधू ज्वेलर्स या दुकानातून भर दिवसा चोरट्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानात प्रवेश करून गंठण व राणी हार खरेदी करायचा आहे असे सांगून दागिने दाखवायला लावले. दुकान मालक यांनी त्यांना वेगवेगळ्या डिझाइनचे दागिने दाखवत असताना दागिने पाहण्याकरता म्हणून ते दागिने हातात घेऊन दुकानदाराचे आपल्याकडे लक्ष नसल्याचे पाहून उभा असलेला त्याचा साथीदार त्याच्या पाठीमागे गाडीवर बसून दोघांनी दागिन्यासह दिवशी घाट रस्त्याच्या गाठ मार्गातून नवा रस्ता बाजूकडे पळून गेले होते.
या घटनेबाबत ढेबेवाडी पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ पोलीस ठाणे पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सराफ दुकानदार विनोद मगर यांनी पोलीस ठाणे रेसर तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता. ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मार्फत तपास करून गुन्हा झालेल्या घटनेपासून ४८ तासाच्या आत आरोपींचा शोध लावला. या चोरी प्रकरणी अटक केलेली आरोपी नंबर एक अमित भीमराव पाटील (वय वर्ष 39 वर्षे) राहणार आणि ता.कराड, जिल्हा सातारा आरोपी नंबर दोन रोहित नामदेव घाडगे वय वर्ष 37 राहणार विश्राम नगर मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सुमारे १०,००,०००/-(दहा लाख रुपये) किमतीचे दहा तोळे सोन्याचे दागिने व चोरीचा गुन्हा करतेवेळी वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहे.
सदर पुण्यातील आरोपींचा तपास पोलीस अधीक्षक सातारा श्री निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कुडकर यांचे सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण श्री सुदाम पाचोरकर, यांचे मार्गदर्शनाखाली देवडी पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दाईगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत चव्हाण, पो.ह.प्रशांत चव्हाण, नवनाथ कुंभार पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माने, सौरभ कांबळे, माणिक पाटील, संकेत पाटील, गणेश किर्वे, उज्वल कदम, माणिक थोरात, विकास पाटील, सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत चव्हाण हे करीत आहेत.
Comments
Post a Comment