निगडे येथे नेत्र तपासणी व चष्मा वाटप संपन्न
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून मु. निगडे (ता. पाटण, जि. सातारा) येथे यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त गावात नुकतेच एक भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर उत्साहात पार पडले. "इथं स्वप्नांना सत्याचा स्पर्श होतो" या भावनेतून आयोजित या लोककल्याणकारी शिबिराला निगडे, धनावडेवाडी आणि शिंदेवाडी परिसरातील ग्रामस्थांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये गावातील एकूण ६५ नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करून त्यांना गरजूंना चष्मा वाटप करण्यात आला. तसेच, तपासणीदरम्यान मोतीबिंदूचे निदान झालेल्या ५ रुग्णांवर पुढील उपचारासाठी लेन्स टाकून यशस्वी ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी निगडे गावचे सरपंच दाजी कदम, उपसरपंच आत्माराम पुजारी, आमदारसाहेबांचे सहकारी दीपक कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास गोडांबे आणि माजी उपसरपंच आनंदा मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच परशुराम कदम, बाळासौ कदम, अधिक कदम, ह.भ.प. प्रकाश कदम, सतीश पाटील, ह.भ.प. सुरेश कदम (आवजी), विठ्ठल कदम, संतोष कदम, विकास कदम, प्रकाश पाटील, रमेश कदम (माऊली), शांताराम कदम, शंकर कदम, संदीप कदम, नितीन कदम, काळू पवार, बंडू पवार, शंकर तेटमे, सुभाष कदम, ह.भ.प. भरत कदम, हनुमंत पाटील यांच्यासह परिसरातील अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. या सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रमाबद्दल सर्व ग्रामस्थांनी आयोजकांचे व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
Comments
Post a Comment