उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो....!

कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून

            उदो बोला उदो, अंबाबाई माऊलीचा हो' उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो' शरद ऋतूतील नवरात्री उत्सव हा साऱ्या भाविकांच्या आस्थेचा विषय केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात देवी भक्त या उत्सवाची वाट पाहत असतात. नऊ दिवसाचा उत्सव कुलधर्म, कुलाचार, उपवास, पूजन हवन -पवन अशा विविध प्रकारे देवीची आराधना केली जाते. पंचमी अष्टमीला विशेष पूजा, खंडे नवमीला आयुध पूजा आणि दशमीला पारने आणि देवीचे सीमा ओलांडणे असे हे स्वरूप आहे. कुंभारगाव सह तळमावले, ढेबेवाडी विभागात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असून अवघं वातावरण दुर्गामय झाले आहे. 

            या नवरात्र उत्सवात प्रत्येक घरामध्ये देवीचे उपवास केले जातात. विशेषतः महिला वर्गाचा यामध्ये मोठा सहभाग असतो. काही गावांमध्ये एक दिवस एक रात्र, तर काही गावांमध्ये दोन दिवस असे निरंकार उपवास केले जातात. अत्यंत कडक असे करताना महिला वर्गांची कसोटी लागते पण वृत्तधारी महिला सहजपणे हा उपवास पार पडतात. त्यानंतर नऊ दिवस केवळ फलाहार वरच त्या उपवास करतात अनेक युवक युवती नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये पायामध्ये चप्पल ही घालत नाहीत. या विभागात धार्मिक संस्कृतिक कार्यक्रमाची  रेलचेल देवीच्या विविध मंदिरामध्ये तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळामध्ये अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात होत आहे. नवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी देवीच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आधी मायेचा जागर भक्ती मय वातावरणात सुरू होत असून दुःख आणि नैराशीचे मूळभ दूर करून मांगल्याची चाहूल घेऊन अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नवदुर्गेचा उत्सवाला आता उधान आले आहे. नवरात्र उत्सवानिमित्त नवरात्र उत्सव मंडळाकडून दांड्याची तयारी केली असून दांडियाचा बहर जागोजागी पाहायला मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान