कराडमध्ये 'फ्रोजो कॅफे' या नव्या दालनाचा १४ ऑक्टोबरला भव्य शुभारंभ

कराड (प्रतिनिधी):

कराड येथील कोयना वसाहतीतील श्री सिद्धिविनायक मंदिर रोडवर 'फ्रोजो कॅफे' या नव्या  दालनाचा भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. साई सर्जिकलपासून सुरू झालेला हा व्यवसाय सई कलेक्शन्सच्या यशस्वी टप्प्यानंतर आता 'फ्रोजो कॅफे'च्या रूपाने अधिक विस्तारत आहे. या नव्या पर्वाचा शुभारंभ बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता उत्साहात होणार आहे. रोजच्या धावपळीतून आणि थकव्यातून एक फ्रेश 'पॉज' देण्यासाठी हे कॅफे एक सुंदर व प्रसन्न ठिकाण ठरणार आहे. या कॅफेमध्ये केवळ कॉफीच नाही, तर ग्राहकांच्या आवडीचे अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत. या शुभारंभ सोहळ्यास नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून आपले प्रेम व आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ग्राहकांची उपस्थिती हीच या नव्या सुरुवातीची खरी शुभेच्छा असेल, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. हे आयोजन साई सर्जिकल (वडूज), सई कलेक्शन्स (कराड) आणि फ्रोजो कॅफे (कराड) यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे.  कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी मिलिंद माळी (९९२२७७६०५०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान