डॉ.नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजींना ‘शरद रत्न’ पुरस्कार जाहीर

कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून

शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘शरद रत्न’ पुरस्कार सद्गुरु राष्ट्रसंत डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी यांना जाहीर झाला आहे. धर्मप्रसार, वारकरी व वीरशैव संप्रदायाचा समन्वय, संत साहित्याचा प्रचार आणि समाज प्रबोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय व अविरत कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठानतर्फे त्यांना या मानद पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. सद्गुरु डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजींनी नेहमीच सामाजिक सलोखा, धार्मिक व अध्यात्मिक प्रबोधन आणि मानवतावादी कार्याला प्राधान्य दिले असून, त्यांच्या याच बहुमोल धार्मिक व सामाजिक योगदानामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा आगामी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे संपन्न होणार आहे. धर्मप्रेमी, वीरशैव लिंगायत तथा सदभक्त मंडळी, वारकरी, भाविक आणि सर्व स्तरांतील नागरिकांकडून सद्गुरुजींवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान