ढेबेवाडीत बेकायदेशीर विदेशी दारू साठा जप्त
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून
ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी एका चार चाकी वाहनातून बेकायदेशीर विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या जागेवर रंगेहात पकडले पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता गाडीच्या पाठीमागिल सीटवर आणि डिक्की मध्ये विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले. या झालेल्या कारवाईत १ लाख ५७ हजार ७६० रुपये किमतीची विदेशी दारू आणि मारुती सुझुकी LXI कार असा २ लाख ७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ढेबेवाडी सळवे रस्त्याकडे जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी मारुती सुझुकी एल एक्स आय दिसून आली.
ढेबेवाडी पोलिसांना या गाडीचा संशय आल्याने सदरच्या वाहनाला थांबवण्याचा इशारा केला, याबाबत गाडीतील मालाबाबत गाडी चालकाकडे विचारणा केली असता चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु ढेबेवाडी पोलिसांनी आपला खाक्या दाखवल्यावर त्यांने आपली नावे सांगितली. अक्षय सुनील कोथमिरे (रा,मंगळवार पेठ कराड) व रवींद्र संजय पवार( रा, गुरुवार पेठ कराड) अशी नावे त्यांच्याकडून सांगण्यात आली. दारू वाहतुकीबाबत परवाना मागितला असता चालकांनी परवाना नसल्याचे सांगितले पण पंचा समक्ष बॉक्स उघडून तपासणी केली असता त्यात विदेशी दारूचा बेकायदेशीर साठा असल्याचे निष्पन्न झाले. सदरची ही धडक कारवाई सुदाम पाचोरकर (उपविभागीय अधिकारी पाटण) यांचे मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ प्रवीण दाईगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत चव्हाण, पो.हा.धीरज कुमार मुळे, पो.हा.प्रशांत चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कांबळे, उज्वल कदम या पथकाने कारवाई पार पडली या धडक कारवाई ने बेकायदेशीर साठे करणाऱ्यांचे ढेबेवाडी विभागात धाबे दणाणले आहे.
Comments
Post a Comment