रयत चा विद्यार्थी म्हणजे एक ब्रँड- श्री इंद्रजीत देशमुख
पाचवड/वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136 वी जयंती महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड या रयत शैक्षणिक संकुलात उत्साहात पार पडली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख साहेब उपस्थित होते. रयतचा विद्यार्थी आत्मविश्वासने सर्व सर्व क्षेत्रात चमकला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भैय्यासाहेब जाधवराव यांनीही कर्मवीरांच्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले तसेच रयत सेवक श्री. पी.एम. काटकर यांनी विद्यार्थ्यांनी नेहमी चांगले काम करणाऱ्याच्या यादीत आपले नाव असावे असे वर्तन ठेवावे असे प्रतिपादन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री लावंड टी.एस. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे मॅडम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ...