राष्ट्रीयता जागर अभियानातुन विद्यार्थ्यांच्यात राष्ट्रभक्ती निर्माण होते - अँड वर्षा देशपांडे


तळमावले/वार्ताहर
            काकासाहेब चव्हाण कॉलेज,तळमावले ता पाटण राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत राष्ट्रीयता जागर अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अँड वर्षा देशपांडे-पँनेल सदस्य,राष्ट्रीय महिला आयोग व सामाजिक कार्यकर्त्या सातारा, संजीव बोंडे (ME.Civil Engineering ), अँड शैला जाधव, कल्पेश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अरूण गाडे होते. कार्यक्रमाची सुरूवात संस्था प्रार्थनेनी झाली.
            यावेळी अँड वर्षा देशपांडे आपल्या मनोगतात म्हणाले कि, १५ आँगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या समारोप प्रसंगी , १५० वर्षाच्या पारतंत्र्यातून अथकपणे केलेल्या स्वातंत्र्य संग्रामातुन इंग्रजाच्या परकीय सत्तेकडुन भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु २६ जानेवारी १९५० रोजी लिखित स्वरुपातील संविधान स्वीकारून आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही ठरलो प्रत्येक भारतीयाला समता, न्याय व स्वातंत्र्य देण्याची ग्वाही आपण दिली.
            आज मागे वळून पहात असता, ज्या समृद्ध सर्वांगिण विकास असणाऱ्या भारताचे स्वप्न आपल्या स्वातंत्र्य सेनानीनी पाहिले होते त्या स्वप्नांचे काय झाले ? असा प्रश्न पडतो राज्यकर्त्यांनी नेमके केले काय कोणत्या दिशेने आपला भारत देश चालला आहे हे शोधण्यासाठी आम्ही राष्ट्रीयता जागर अभियान सुरू करून विद्यार्थ्यांच्यात राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय म्हणूनच मागील ७५ वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर नागरिकांनी जबाबदारी वागण्याची वेळ आली आहे ,भुमिका घेण्याची वेळ आली आहे ,देश वाचला पाहिजे भारतीयत्व वाचले पाहिजे लोकशाही व संविधानानुसार देश चालला पाहिजे म्हणूनच आपण सर्वांनी तात्काळ विचार करूया आणि या राष्ट्रीयता जागर अभियानात सहभागी होवूया अशा पध्दतीने मँडमनी सविस्तर माहिती सांगुन या अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.
            यावेळी संजीव बोंडे सरांनी देखील मौलिक मार्गदर्शन केले तसेच अँड शैला जाधव मँडमनी कायदा कानुन नियमावली तसेच सोशल मिडियाचा वापर कसा करणे यासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली तसेच कल्पेश जाधव सरांनी समते संदर्भातील गीतातुन मोलाचे प्रबोधन केले.
                अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ अरूण गाडे म्हणाले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार करून घटनेनुसार आपणास जगाण्याची उर्मी निर्माण केली संविधानानुसार आपण सर्व सामान्य नागरिकांनी लोकशाहीचा स्वीकार करून आपण आपल्यामधला प्रथम भेदभाव नष्ट करा व अखंड भारतात फक्त आणि फक्त मानवता हाच धर्माचे पालन करणे गरजेचे आहे संविधानात जे काही सांगितले आहे त्याचा प्रामाणिकपणे नागरिकांनी अमंलबजावणी करून आपल्या देशात एकता, समानता ऐक्य बंधुता हा भाव निर्माण झाला पाहिजे व याची सतत आपणास जाणीव झाली पाहिजे . शिक्षण, आरोग्य व पर्यावरण या गोष्टीवर आपण वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन करून भारताला समृध्द करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहु असा सल्ला दिला.
                कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा इरफान नायकवडे यांनी केले व सुत्रसंचालन प्रा सौ ज्योती बाऊचकर यांनी केले आभार प्रा डॉ उत्तम वाघमारे यांनी केले. कार्यक्रमात रा से यो विभागातील प्रा महेश चव्हाण, प्रा संभाजी नाईक, प्रा सी जी पुटवाड, प्रा सचिन पुजारी तसेच प्रशासकीय कर्मचारी इ. सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. तसेच कार्यक्रमास गुरूदेव कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.



Comments

  1. It was very effective program which enlightened the minds of NSS cadets.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न