शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा एक प्रमुख घटक श्री.जे. एस. मदने

पाटण/वार्ताहर

        मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये आज डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन साजरा करण्यात आला ,या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .जे .एस .मदने सर अध्यक्षस्थानी होते,यावेळी ते म्हणाले की, भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, शास्त्रज्ञ इ. तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवीत असतात. आपल्या आई-वडिलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरीत्या पालकच असतात. शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करतो.असे ते यावेळी म्हणाले,

            या कार्यक्रमावेळी कांदबरी शेजवळ, संस्कृती शेजवळ, श्रीवर्धन शेजवळ, अक्षरा शेजवळ या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त  केले,तसेच,एस.एस. मनेर मॅडम,श्री.संतोष कदम यांनीही आपली मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या शेजवळ या विद्यार्थिनीने केले,तर आभार  आर्यन शेजवळ याने मानले,या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न