श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले येथे " शिक्षक दिन " कार्यक्रम संपन्न
तळमावले/वार्ताहर
श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले येथे शिक्षक दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रवींद्र माने हे होते.तर प्रमुख उपस्तीथी श्री सुरज यादव (सरपंच ग्रामपंचायत, ताईगडेवाडी ) यांची होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आनंदराव सावंत यांनी भूषवले. 5 सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन " शिक्षक दिन " म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी विद्यालयामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रवींद्र माने व सरपंच सुरज यादव यांच्यामार्फत विद्यालयातील सर्व गुरुजन शिक्षकांचे शाल,श्रीफळ व पेन देऊन स्वागत सत्कार करण्यात आले व आदर भावना व्यक्त केली.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी, तळमावले गावचे सरपंच सुरज यादव यांनी, " सर्व विद्यार्थी व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षकांना आदराचे स्थान दिल्यामुळे, आपण आज श्रेष्ठ पदावर पोहोचल्याचे मान्य केले. तसेच स्वतःच्या जडणघडणीत, शाळेचा व शिक्षकांचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले "
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रवींद्र माने यांनी आपल्या वक्तव्यामध्ये, " शिक्षक हा समाज परिवर्तन घडवून,आदर्श भावी पिढी व देशाचा आधारस्तंभ घडवू शकतो. तसेच सृष्टीचे संतुलनच मुळात शिक्षकांमुळेच आबाधित आहे. यामुळे शिक्षकांचा आदर करणे हे आपले परम कर्तव्य आहे. "
विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री जंगानी पी. जी. यांनी आपल्या वक्तव्यामधून, " विद्यार्थ्यांना शिक्षकांचे महत्त्व व आदराचे स्थान स्पष्ट केले. " तसेच विद्यालयातील ज्येष्ठ अध्यापिका सौ मुळीक आर एस यांनी विद्यार्थी जीवनामध्ये गुरुजनांचे महत्त्व व स्थान स्पष्ट केले.
' चला बापूजींचा गुरुदेव कार्यकर्ता बनुया .' या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी " एक दिवस शाळेमध्ये अध्यापनाचा अनुभव घेतला. " विद्यालया मधील सर्व कामकाजाचे नियोजन व संचलन इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांनी केले.
विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापक श्री. सावंत ए. एस. यांनी विविध सहशालेचे उपक्रमांचे महत्त्व विशद करताना चार भिंतीच्या वर्गामध्ये विद्यार्थी घडत असताना त्याचे अनुभव विश्व विस्तृत व्हावे यासाठी अशा उपक्रमांची गरज विद्यालयामध्ये असल्याचे नमूद केले.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री प्रसाद मोरे यांनी श्री.महेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी रोख रक्कम 4 हजार रुपयांची देणगी विद्यालयास सुपूर्द केली. याबद्दल मुख्याध्यापकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दिवसभर अध्यापनाचा अनुभव घेत शिक्षकांचे भाव विश्व जाणून घेतले. सायंकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण विद्यालयातील इतर सर्व विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षकांच्या जबाबदाऱ्या किती खडतर आहेत याविषयीचे आपले विचार प्रकट केले.
तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री सचिन यादव यांसह सदस्य सौ. शितल ताईगडे, सौ. सुप्रिया पाटील, माता पालक संघाच्या सदस्य सौ. दिपाली यादव, सौ वैशाली पाटील, सौ अश्विनी कोकाटे, श्री सुधीर कुंभार,श्री. बापूराव गोफने, सौ सुजाता सावंत, सौ अश्विनी डुबल, श्री उमेश चव्हाण इत्यादी सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रेया ताईकडे व कुमारी प्रियांका लोहार यांनी केले, सकाळ सत्रातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी तनिष्का पाटील हिने केले, तर विद्यार्थी मुख्याध्यापक मनोगत तेजकुमार जंगाणी यांनी केले. आभार विद्यालयातील विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. सानिया माने सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Comments
Post a Comment