श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले च्या विद्यार्थ्यांनी घेतला " वर्षा सहलीचा " आनंद
तळमावले/वार्ताहर
श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले च्या विद्यार्थ्यांनी " वर्षा सहली " मधून निसर्गरम्य वातावरण, भौगोलिक परिस्थिती व ट्रेकिंगचा अनुभव घेत मनमुराद आनंद लुटला. विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री सावंत ए. एस. यांचे मार्गदर्शन व ज्येष्ठ शिक्षक व सहल विभाग प्रमुख श्री लोहार एम. के. यांच्या नियोजनानुसार सहलीचे ठिकाण गुढे ( वरची शिबेवाडी ) डोंगराळ परिसरामध्ये स्थापन झालेली "काळंबा देवी मंदिर " या मंदिरास भेट देण्याचे आयोजन करण्यात आले होते.
श्री काळंबा देवी चरिटेबल ट्रस्ट मौजे शिबेवाडी ( गुढे ) चे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचे श्रीफळ देऊन स्वागत सत्कार केले. सर्व विद्यार्थ्यांसाठी या मंदिर ट्रस्ट द्वारे भोजनाची सोय करण्यात आली होती.
. माता काळंबादेवी पश्चिम महाराष्ट्रातील डोंगरावरती वसलेले देवस्थान असून गोकुळाष्टमी दिवशी देवीचा भंडारा भरतो वाडीसह गावातील माहेरवाशीने खरा नारळांनी देवीची ओटी भरण्यासाठी डोंगरावरती येतात. गेली अनेक दशके चाललेले या उत्सवांमध्ये दिवसेंदिवस अधिकची भर पडत आहे. या उत्सवासाठी ढेबेवाडी खोऱ्यातील बहुतांशी सर्व गावातील नागरिक येतात.याला अनुसरून मंदिर परिसरामध्ये पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता केली विशेषतः मंदिर परिसरातील प्लास्टिकचे निर्मूलन विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले व विद्यालय व माता काळंबादेवी देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणासारखा विधायक कार्यक्रम देखील पार पडला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केला. प्रार्थना, भक्ती गीते, लोकगीते विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केली. विद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनींनी मिळून गरबा नृत्य केले. कार्यक्रमाचे नियोजन व संचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री जंगानी पी.जी. यांनी केले.
मा. मुख्याध्यापक श्री. सावंत ए. एस. यांनी आपल्या प्रस्ताविकामधून विद्यार्थ्यांना वर्षा सहलीचा उद्देश व महत्व समजावून सांगितले. सहल विभाग प्रमुख श्री लोहार एम. के. यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या वर्षा सहलीमध्ये विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment