नुतन मराठी शाळा व रोटरी क्लब ऑफ मलकापूर यांच्या वतीने पर्यावरण पुरक श्रीगणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन

कराड/प्रतिनिधी

            नुतन मराठी शाळा कराड व रोटरी क्लब ऑफ मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण पुरक श्रीगणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.शाडू मातीपासून विद्यार्थ्यांनी सुबक रेखीव आकर्षक सुंदर अशा मुर्ती बनविल्या. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक मा. महेश कुंभार सर  यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली.मुख्याध्यापक कांबळे मॅडम, शिक्षिका रो. शुभांगी शेलार मॅडम, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. विलासराव पवार,  सचिव रो.विनोद आमले, रो.सलीम मुजावर, रो.दोडमनी सर, रो.भगवानराव मुळीक आणि सर्व शिक्षका शिक्षकेतर स्टाफ यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्कृष्ट गणेश मूर्ती बनविलेल्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ मलकापूर यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आली.

            कार्यशाळेमध्ये ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पर्यावरण पूरक गणपतीची प्रेरणा लहान वयातच मुलांना मिळावी आणि त्यांच्या स्वतःमध्ये आणि कुटूंबामध्ये जनजागृती व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. मुलांनी बनवलेल्या मूर्ती गणोबा म्हणून स्वतःच्या घरात प्रतिष्ठापना करणार असल्याची सर्व मुलांची प्रतिक्रिया होती.




Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न