दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना प्रीतीसंगम हास्य परिवार तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत बफर झोन भागात येत असलेल्या मोडकवाडी,म्हाळुंगेवाडी (सातर)येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे येथील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ओळखून कराड येथील प्रीतीसंगम हास्य परिवार या शाळेच्या मदतीसाठी धावून आला.
मी हसणार, इतरांना हसविणार पण नाही कुणाला हसणार".
हे या परिवाराचे ब्रीदवाक्य आहे 20 मार्च 1998 रोजी रमाकांत गुरसाळे व सहकारी मिळून यांनी स्थापन केलेला.हा परिवार वेगळवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतो. या परिवारामध्ये डॉक्टर ,शिक्षक प्राध्यापक ,व्यवसायिक अनेक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. हा परिवार अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो.या परिवाराने सर्व विद्यार्थ्यांना लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य देवून त्यांना खाऊ वाटप केला.
विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवन कसे जगावे,अभ्यास कसा करावा.कठीण प्रसंगाला कसे हसत हसत तोंड द्यावे. आनंददायी जीवन व वेगवेगळे आनंद देणारे उपक्रम सांगितले. रमाकांत गुरसाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.. कुलकर्णी यांच्या 'जाग' कवितेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
तिन्ही शाळेतील विद्यार्थी चांगले होतकरू आहेत.आम्ही योग्य ठिकाणी मदत केली.आणि आणखी मदत करणार असे मत पी.डी.पाटील,व रमाकांत गुरसाळे यांनी मत व्यक्त केले.
चौकट :
विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद आणि हास्य...
तीनही शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य ग्रुपने खरोखरच हास्य आणले. यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगली आवड निर्माण होईल. मोडकवाडी शाळेत सातर, हेळोबावाडी, म्हाळुंगेवाडी (सातर) परिसरातून विद्यार्थी चालत येतात. त्यांच्यासाठी सायकल असावी असे पालकांनी मत व्यक्त केल.
दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी.
मोडकवाडी शाळा ग्रामीण व दुर्गम भागातील असून डिजिटल शाळा,विद्यार्थ्यांसाठी टॅब यासाठी आमचे प्रयत्न व पाठपुरावा सुरु आहे असे मत मुख्याध्यापिका वंदना खेडकर व शिक्षक राजेंद्र दराडे यांनी यावेळी व्यक्त केले.
भारती संकपाळ, उल्हास पावस्कर,धनाजी देसाई, महेश गुरसाळे,पंडीतराव देशपांडे, महादेव झिमरे,विजयमाला कापसे,सुजाता भंडारे यांचे सहकार्य लाभले. अमोल भिसे स स्मिता गडगडे यांनी स्वागत केले विक्रमजीत कापसे यांनी आभार मानले.


Comments
Post a Comment