वांगव्हँली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे पत्रकार बाळासाहेब रोडे यांची निवड


तळमावले/वार्ताहर

     तळमावले ता.पाटण येथे वांगव्हँली पत्रकार संघाची वार्षिक आढावा बैठक आयोजित करण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली यावेळी  पत्रकार  दैनिक लोकमतचे बाळासाहेब रोडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली 

       उपाध्यक्षपदी तरुण भारतचे नितीन बेलागडे, सचिवपदी प्रभातचे विजय सुतार तर कार्याध्क्षपदी पुण्यनगरीचे प्रमोद पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

   पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय लोहार यांच्या अध्यक्षतेखाली तळमावले येथे पत्रकार संघाची बैठक झाली. यावेळी पुढारीचे पत्रकार तुषार देशमुख, कृष्णाकाठ चे संपादक चंद्रकांत चव्हाण, जेष्ठ पत्रकार पोपटराव झेंडे, पोपटराव माने, डॉ संदीप डाकवे, साप्ताहिक कुंमजाई पर्वचे संपादक प्रदिप माने, अमोल चव्हाण, सुरेश पाटील उपस्थित होते.

 गेल्या चार वर्षाच्या कालावधीत वांग व्हँली पत्रकार संघाने विविध उपक्रम राबवून समाजोपयोगी घटकांना प्राधान्य दिले असून यापुढेही संघाची अशाच पध्तीने वाटचाल सुरु राहिल.असे संजय लोहार यांनी सांगितले.

 तुषार देशमुख यांनी स्वागत केले तर पोपटराव झेंडे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न