माईंगडेवाडी येथे आरोग्य शिबीराचे आयोजन


तळमावले/वार्ताहर

प्रति वर्षाप्रमाणे माईंगडेवाडीचा राजा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 20 सप्टेंबर रोजी ढेबेवाडी पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला. या आरोग्य शिबिराचा परिसरातील लोकांनी लाभ घेतला अनेक युवकांनी रक्तदान ही केले

सामाजिक हेतू डोळ्यासमोर ठेवून मंडळांनी प्रतिवर्षी आरोग्य शिबिराच्या आयोजन केलेले असते‌.

कोरोना महामारी काळात राबवलेल्या उपक्रमामुळे येथील मंडळाचे चर्चेत आले आहे. मुंबईकर सर्व ग्रामस्थ गणेश उत्सव काळात गावाकडे घेऊन सामाजिक उपक्रम राबवत  असतात.पर्यावरण पूरक गणेश उत्सव त्याचबरोबर उत्कृष्ट मंडळ म्हणून ही मंडळ कार्यरत आहे. या आरोग्य शिबिरास तज्ञ डॉक्टर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली 

श्री गणेश कृपा सेवा मंडळ माईंगडेवाडी मंडळाच्या कार्याचे प्रचंड कौतुक होत आहे

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न