पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या घरी श्री गणरायाचे उत्साहात आगमन व प्रतिष्ठापना
तळमावले/वार्ताहर
पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या घरी पारंपरिक पद्धतीने, पालखीतून मिरवणुकीद्वारे श्री गणरायाचे उत्साहात आगमन झाले. याप्रसंगी अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणात श्री गजाननाची आरती करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी राज्यातील जनतेला उत्तम आयुरारोग्य आणि सुखसमृद्धी लाभावी अशी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी गणपती बाप्पाचरणी प्रार्थना केली. याप्रसंगी देसाई कुटुंबीय तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


Comments
Post a Comment