काळगाव हायस्कुलमध्ये शिक्षक दिन साजरा

तळमावले/वार्ताहर

             रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज काळगाव  येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता 10 वी च्या व 12 वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका घेऊन संपूर्ण दिवसाची जबाबदारी पार पाडली. 

            विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.कांबळे ए.पी.सर,दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा चे विद्यमान संचालक श्री.देसाई व्ही.टी. सर,ज्येष्ठ शिक्षिका जाधव एम.एस. मॅडम,इ.10 वीच्या वर्ग शिक्षिका श्रीम. माने एस.एम.मॅडम विद्यार्थ्यांमधून निवडलेल्या मुख्याध्यापिका कु.साक्षी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. साक्षी पाटील हिने केले यानंतर कु.आश्लेषा बावडेकर हिने सर्व शिक्षकांचे स्वागत व सत्कार केला. त्यानंतर विद्यार्थी मनोगत मध्ये कु.कृतिका बावडेकर,कु. विदिशा काळे,विराज पाटील,वैभव पवार या विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षक दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर इ.10 वीच्या वर्गशिक्षिका श्रीम. माने मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  सौ.जाधव एम.एस.मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

            विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कांबळे ए.पी.यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती सांगितली. व सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास विद्यालयाच्या सौ.यादव एस.एस,सौ.मुळे एम.के,श्री.कांबळे टी. व्हि,श्री. साबळे एम.जी,श्री.धोत्रे एस.पी,श्री.थोरात एम. एस, सौ.पाटील व्ही. व्ही,कु. पवार पी.ए,कु.साबळे पी.एस,श्रीम.काळे एस.जे.तसेच पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस सौ.रेखाताई पुजारी व सौ.कोमल जगताप उपस्थित होत्या. 

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वैष्णवी पाटील हिने व आभार कु.संचिता नाचणकर हिने मानले. दिवसाची सुरुवात म्हणजे शालेय परिपाठ व संपूर्ण कार्यक्रम इंग्रजी मधून संपन्न झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा,शाखा काळगाव चे शाखाप्रमुख श्री. काकडे साहेब व सौ.गंभीर मॅडम यांच्यावतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न