शिबेवाडीच्या डोंगरावरील माता काळंबा देवीचा वार्षिक भंडारा गुरुवारी



तळमावले/वार्ताहर

पाटण तालुक्यातील  ढेबेवाडी खोऱ्यातील गुढे ग्रामपंचायत हद्दीतील वरची शिबेवाडी (डोंगरावरील) जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या आणि नवसाला पावणाऱ्या माता काळंबादेवीचा वार्षिक भंडारा जत्रोत्सव गुरुवारी दि.7 सप्टेंबर, 2023 रोजी धुमधडाक्यात हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.

वरची शिबेवाडी (डोंगरावरील) हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री काळंबादेवी मातेचा वार्षिक भंडारा दरवर्षी गोपाळकाला दिवषी साजरा केला जातो. त्यानिमित्त या मंदिरात गुरुवार दि.31 ऑगस्टस्ट, 2023 पासून अखंड विना व हरिनाम सप्ताह सुरु आहे. या पारायण सोहळयात दररोज काकड आरती, हरीपाठ, कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत. गुरुवार दि.7 सप्टेंबर, 2023 रोजी दिवसभरात देवीची पालखी मिरवणूक, दहीहंडी फोडणे आणि महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. 

दुपारी शिवरीच्या माळावर पाुचपतेवाडी (पो.गुढे) येथील हनुमानाची पालखी आल्यानंतर दोन्ही पालख्यांची भेट होवून पालख्यांनी मंदिराची प्रदक्षिणा घातल्यानंतर दहीहंडी फोडली जाते. त्यानंतर महाप्रसाद वाटप होतो. या दिवशी मेघराजा हमखास हजेरी लावतो असे म्हणतात. त्यावेळी पावसातही भाविक मोठया आनंदाने महाप्रसाद घेण्यासाठी रांगा लावतात. या भंडारा उत्सवासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबईतील देवीचे भाविक हमखास हजेरी लावतात. भाजी आणि भाकरी चा महाप्रसाद असलेला भागातील हा एकमेव भंडारा आहे. अत्यंत शांततेत एकोप्याने हा भंडारा उत्सव होत असतो. या उत्सवाची लोक आवर्जून वाट पाहतात.







Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न