कालवडे येथे गुरुसेवा संगीत महोत्सव संपन्न
तळमावले/वार्ताहर
संगीतसुर्य उस्ताद अमीर खान साहेब यांचे शिष्य वेदांतवेद्योवर प.पु. पंडित रघुनाथराव थोरात (कालवडेकर महाराज) यांचे स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेला अनुभूती सामाजिक ट्रस्ट , कालवडे आयोजित "गुरुसेवा संगीत महोत्सव" हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम कालवडे येथे नुकताच संपन्न झाले
अनुभूती ट्रस्ट , कालवडे यांचे कडून कलेची अव्याहत ,निस्पृहपणे, श्रध्दा पूर्वक उपासना करणाऱ्या कलाकारांना दरवर्षी कला तपस्वी हा पुरस्कार दिला जातो. २०२३ या वर्षीचा पुरस्कार शास्त्रीय गायक पंडित. श्री अशोक कुलकर्णी( कडेगांव ) यांना मा.उदयसिंह थोरात तसेच श्री.जयकर साठे यांच्या हस्ते देण्यात आला.
या महोत्सवात कलाकारांनी आपली कला सादर केली
श्री.गंगाराम माने बासरी एकल वादनात (वृंदावणी सारंग ) सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि कु.स्वरा किरपेकर हिने हार्मोनियम एकल वादनामध्ये राग मारू बिहाग सादर केला तसेच श्री.श्रीराज बर्गे यांनी तबला सोलो वादन केले त्यात त्यांनी (त्रिताल मध्ये पेशकार आणि अन्य काही रचना) सादर केल्या,त्यानंतर श्री. महेश साठे यांनी राग गौडसारंग सादर केला आणि श्री अशोक कुलकर्णी यांनी ( कडेगांव ) यांनी राग मधुवंती गायला आणि संत भार पंढरीत या अभांगाने सांगता केली त्यांना हार्मोनियम साथ श्री कैलास सावंत यांनी केली कलाकारांना तबला साथ श्री मयूर जोशी , व हार्मोनिम साथ श्री विजय जाधव यांनी केली. तसेच श्री सुहास वागिरे यांनी साऊंड सिस्टीम ने कार्यक्रम योग्य रीतीने श्रोत्यांपर्यंत पोहचवला. महोत्सवाचे आभार श्री. जयकर साठे यांनी मानले.

Comments
Post a Comment