येळेवाडी येथे रक्तदान शिबीरास प्रतिसाद

काळगांव/वार्ताहर

पाटण तालुक्यातील येळेवाडी (काळगांव) येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. श्री महालक्ष्मी ब्लड सेंटर, कराड, जय बजरंग गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळ येळेवाडी यांच्या वतीने हे शिबीर आयोजित केले होते. सुमारे 28 रक्तदात्यांनी यात रक्तदान केले. सचिन आत्माराम येळवे, सचिन सुरेश येळवे, शैलेश शिवाजी येळवे, गणेश किसन निवडूंगे, आकाश नारायण गडूगले, विवेक तुळशीराम जाधव, रोहन रमेश मस्कर, गणेश विलास येळवे, विनायक दत्तात्रय येळवे, अनिकेत अशोक जाधव, सुनिल शिवाजी जाधव, प्रथमेश अशोक जाधव, निलेश  विठ्ठल शेंडे, राकेश पाटील (काळगाव), दिनेश विजय येळवे, सुनील सदाशिव मस्कर, सागर महादेव मस्कर, प्रशांत पांडुरंग मस्कर, राहुल शिवाजी येळवे, सतीश बाबुराव येळवे, विलास महादेव येळवे, प्रवीण बाबुराव येळवे, महेश लक्ष्मण येळवे, साहिल किसन येळवे इ.नी रक्तदान केले.

जय बजरंग मंडळाच्या वतीने नेहमीच विधायक उपक्रम राबवले जातात. यंदा राबवलेल्या रक्तदान शिबीराचे परिसरातून कौतुक होत आहे.



Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न