मत्रेवाडी येथील कुत्र्यास अजगराने घेतला चावा

तळमावले /वार्ताहर

         मत्रेवाडी ता.पाटण येथे सुरेश मत्रे यांनी शिवारात जनावरे चरावयास सोडली होती. त्यांच्या बरोबर डॉबरमॅन जातीचा कुत्रा ही रानात गेला होता या कुत्र्यास आजगराने चावा घेतला हे मत्रे यांच्या लक्षात आले असता त्यांनी त्यास ढेबेवाडी येथील पशुवैद्यकीय दाखान्यात उपचारासाठी नेहले. डॉक्टरांनी तात्काळ इलाज केला असून त्याचा प्राण वाचविण्यात यश आले आहे.

       याबाबत अधिक माहिती अशी सुरेश मत्रे दररोज रानात पाळीव जनावरे घेवून जात असतात ते सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता न्हावाच्या रानात गेले होते त्यांच्या सोबत घरी पाळलेला डॉबरमॅन जातीचा कुत्राही होता मत्रे जनावरे सोडून झाडाखाली बसले होते तर कुत्रे पुढे जवळच फिरत होते अचानक कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून मत्रे यांनी पाहिले तर अजगर दिसून आला या आजगराने कुत्र्याच्या पुढच्या डाव्या पायाला चावा घेतला होता ही घटना 4 वाजण्याच्या सुमारास घडली यानंतर मत्रे यांनी ढेबेवाडीचे पशुवैद्यकीय अधिकारी ऋषिकेश व्हनाळे यांना फोन केला त्यांनी तात्काळ कुत्र्यास आणण्यास सांगितले ढेबेवाडी येथे त्याच्यावर उपचार करण्यात आले डॉक्टरांनी तात्काळ इलाज केल्याने कुत्रा वाचला असल्याचे मत्रे यांनी सांगीतले.



Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान