काळगाव विद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंतीचा सोहळा उत्साहात


काळगांव/वार्ताहर

             रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काळगाव. विद्यालयामध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंतीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. परंपरेनुसार कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक सजवलेल्या बैलगाडीतून काढण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कांबळे ए.पी.सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ.जाधव एम.एस. व सर्व सेवकवृंद व ग्रामस्थ यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व सौ.लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

            मुख्याध्यापक ए.पी. कांबळे यांच्या हस्ते गाडीमधील प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक पद्धतीने निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळा, शेतकरी तसेच सर्व प्रांतातील विविध वेशभूषा केल्या होत्या. मिरवणुकी दरम्यान ठीकठिकाणी ग्रामस्थ महिलांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले. काळगाव व भरेवाडी या दोन ठिकाणी झांज पथक, लेझीम पथक व टिपरी नृत्य घेण्यात आले. 

            विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना विद्यालयाचे ग्रंथपाल श्री.थोरात एम.एस.यांच्यावतीने खाऊ वाटप करण्यात आले. बैलगाडीचे मालक श्री.सर्जेराव पाटील व त्यांचे सहकारी श्री.अरविंद पुजारी यांनी बैलगाडी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या वतीने श्रीफळ व कर्मवीरांची प्रतिमा देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटीचे सदस्य, शाळा व्यवस्थापनाकडून समितीचे सदस्य, शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्य, पालक शिक्षक संघ सदस्य, विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी काळगाव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न