डाकेवाडीच्या बाल गोविंदानी जिंकली मुंबईकरांची मने



तळमावले/वार्ताहर

डाकेवाडीतील अजिंक्य विश्वनाथ डाकवे व श्री सुनील मुटल या दोन बाल गोविंदानी दहीहंडीच्या शेवटच्या थरावर जावून दहीहंडी फोडल्या. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या खेळामध्ये अजिंक्य आणि श्री यांनी दहीहंडी फोडून मुंबईकरांची मनं जिंकली.

अजिंक्य डाकवे यांने 6 व्या थरावर जावून ए वन स्टार दहीहंडी पथक कळंबोली नवी मुंबई या पथकातून दहीहंडी फोडली. त्याला शिक्षक गणेश वत्रे, सुमित सुर्यवंशी, पुष्कर ओवे, निरंजन ओवे, वडील विश्वनाथ डाकवे, आई सौ.वनिता डाकवे यांनी मार्गदर्शन केले. 

तर श्री मुटल याने शिवसाई बाल गोविंदा पथक या पथकातून चक्री दहीहंडी फोडली. त्याला या मंडळातील सहकारी यांच्यासोबतच वडील सुनील मुटल आणि आई सौ.आशा मुटल यांनी मार्गदर्शन केले. 

या आंबिवली या ठिकाणी पाटण तालुक्यातील राहत असलेल्या मुलांनी शिवसाई बाल गोविंदा पथक सुरु केले असून या पथकात सुजल देसाई, अमित बोळावे, आशिष गायकवाड, ओंकार मस्कर, अभिजीत मोळावडे, रोहन बोळावे, रोहन मस्कर, अमित गायकवाड, ओंकार कुळये, दर्शन जाधव, हर्शल माटेकर, श्रेयश महांगडे, साहील तुपे, कनिष्क जाधव, प्रवीण, सक्षम, समर्थ पवार, यश बोळावे, जीवेश, ओम बेंडकोळी, सागर यादव, अथर्व कदम, प्रेम मोरिया, साहील बोर्गे, ओंकार जाधव, सिध्देश कदम, राजेष महांगडे, रियांश , महेश दातखिळे, क्रीश भालेराव इ. मुले आहेत. या दोन्ही बाल गोविंदाचे परिसरातून कौतुक होत आहे






Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग