तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आचरेवाडी विद्यालयाचे घवघवीत यश



ढेबेवाडी/वार्ताहर

      न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आचरेवाडी या विद्यालयाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विविध खेळांच्या प्रकारात घवघवीत यश संपादन केले असून आचरेवाडी विद्यालयाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला आहे. 

      पाटण येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मैदानी क्रीडा प्रकारात  विद्यालयातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.14 वर्षे वयोगटात प्रणव सुरेश सूर्यवंशी याने 200मीटर व 400 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम,19 वर्षे वयोगटात ओमकार दगडू कदम 3000 मीटर धावणे मध्ये प्रथम, तर भालाफेक द्वितीय, समिक्षा दिनकर पवार हिने 19 वर्ष वयोगटात 3000 धावणे स्पर्धेत प्रथम व सायली अनिल साबळे व्दितीय लक्ष्मी संजय कुंभार 19 वर्षे वयोगटात गोळाफेक सपर्धेत तृतीय, समीक्षा पवार उंच उडी तृतीय, 19 वर्ष वयोगटत सांघिक 4×400 मीटर रिले प्रथम यामध्ये सहभागी खेळाडू यश कृष्णा टेटमे, संस्कार शंकर गुंडगे, प्रथमेश बाजीराव कळंबे, अनिकेत पोपट मस्कर, रामदास लक्ष्मण डाकवे , 19 वर्षे वयोगट(मुली) सांघिक 4×400 मीटर रिले प्रथम सहभागी खेळाडू  समीक्षा दिनकर पवार,  सानिका शशिकांत शिंदे, सायली अनिल साबळे, लक्ष्मी संजय कुंभार, हॉलीबॉलमध्ये 17 वर्ष वयोगात मुलांच्या व मुलींच्या संघाने प्रथम तर 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला तसेच खो - खो संघाने द्वितीय बुद्धिबळ मध्ये 19 वर्ष वयोगटत शुभम तुकाराम बेर्डे द्वितीय, विराज दत्तात्रय भास्टे तृतीय या खेळाडूंनी यश संपादन केले.

          या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक जालिंदर लोहार, प्रा. सचिन खंडझोडे, सतिश दिंडे यांनी मार्गदर्शन केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  शिक्षकांचे विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी प्राचार्य प्रकाश पाटील, अध्यक्ष ॲड. भरत पाटील,उपाध्यक्ष माजी प्राचार्य उज्वला पाटील मॅडम, प्राचार्य बबन साबळे, सर्व शिक्षक शिक्षेत्तर यांनी अभिनंदन केले

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न