आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे म्हणजेच आपल्या आयुष्याची घडी बसविणे होय - भरत पाटील (नाना)


तळमावले/वार्ताहर

                        प्रचंड कष्ट, जिद्द. चिकाटी,  प्रामाणिकपणा, सातत्यपूर्ण अभ्यास, प्रबळ इच्छाशक्ती  या गुणांच्या बळावर आत्मविश्वासाने ध्येय साध्य करता येते. आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे म्हणजेच आपल्या आयुष्याची घडी बसविणे होय, असे प्रतिपादन  मा. भरत पाटील (नाना) (संचालक, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ, भारत सरकार) यांनी केले.  काकासाहेब चव्हाण कॉलेज, माजी विद्यार्थी मंडळ व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले  यांचे संयुक्त विद्यमाने   'अकरावी आर्टस, कॉमर्स अॅन्ड सायन्स व बी. ए., बी. कॉम, बी. एस्सी. भाग एक  या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी  'नवागतांचे स्वागत व शैक्षणिक साहित्य  वाटप  समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.              

                        ते  पुढे म्हणाले, यशस्वी होण्यासाठी वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संकटाना कधीच घाबरू नये.         या समारंभासाठी श्री. बाळकृष्ण सावंत (सदस्य, महाविद्यालय विकास समिती),  प्रा. अधिकराव कणसे (सचिव  माजी विद्यार्थी मंडळ काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले), मा. वसंतराव हारूगडे (शिक्षक नेते), मा. मोहिते साहेब (सेवानिवृत्त पी. एस. आय.), मा. कवी आनंदराव चव्हाण,  मा. अरुण शिबे, मा. रमेश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.                                            मा. राजाभाऊ माने  ( अध्यक्ष माजी विद्यार्थी मंडळ काकासाहेब चव्हाण  कॉलेज, तळमावले) यांनी प्रास्ताविक व मनोगत व्यक्त केले. त्यांनी  विद्यार्थ्यांना मौलिक, प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींचा आदर्श  समोर ठेवून आयुष्याची वाटचाल करावी. तरुणाई म्हणजे ज्यांच्या हातात सत्ता, हृदयामध्ये ऊर्जा आणि डोळ्यात स्वप्ने असतात.  महाविद्यालयीन काळात विविध कौशल्ये आत्मसात करावी.                       

                प्रभारी प्राचार्या प्रो.  (डॉ.) उषादेवी साळुंखे म्हणाल्या, महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माजी विद्यार्थी मंडळाचे कार्य बहुमोल आहे. विद्यार्थ्यांच्यामधील  सुप्त गुणांना वाव देण्याचे काम गुरुदेव कार्यकर्ते  करतात. विद्यार्थ्यांनी  राष्ट्रीय सेवा योजना,  सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा सहभाग किंवा महाविद्यालयाकडून जे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, अशा उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी असणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमधुनच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक व बौद्धिक विकास होत असतो.     

            कौशल्याधारित विविध कोर्सच्या  माध्यमातून मुलींसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. अशा उपक्रमांमध्ये मुलींनी सहभाग घेऊन आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. यावेळी माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष *मा. राजाभाऊ माने तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्या आर्थिक योगदानामधून नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत वह्या, पेन देऊन करण्यात आले. पुढील वाटचालीसाठी आपुलकीने शुभेच्छा दिल्या.                                                     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष मा. राजाभाऊ माने माजी विद्यार्थी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.  

                    तसेच प्रभारी प्राचार्या डॉ. उषादेवी साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. विक्रांत सुपुगडे, प्रा. राजेंद्र भिसे, सांस्कृतिक विभाग   सदस्य, प्राध्यापक व  शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थिनी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ शूटींग डॉ. महेश लोहार, प्रा. आय. बी. नायकवडी  यांनी केले.  फलकलेखन डॉ. राजेंद्र लादे यांनी केले.               

                    सूत्रसंचालन प्रा. सचिन पुजारी, प्रा. सौ. दिपाली पाटील यांनी केले. आभार  प्रा. (डॉ.) जी. एन. पोटे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न