गुरु म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ : श्री. शरद शेजवळ

सोनवडे :-

शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो, असे प्रतिपादन  मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शरद शेजवळ सर यांनी केले. ते आज शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या माध्यमिक विद्यालयामध्ये गुरूपौर्णिमा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी पुढे ते म्हणाले की,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून तो दीपस्तंभाप्रमाणे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असतो, आजच्या बदलत्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता मूल्याधिष्ठित शिक्षण आत्मसात करणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी शिस्त, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारावा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले 

 या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्व गुरवर्यांचे पूजन केले, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले गुरूप्रती मत आपल्या भाषणातून व्यक्त केले, यावेळी श्री.ए.के.जाधव, श्री. एस.बी.कदम , सौ.एस. एस.गोसावी या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले,

या कार्यक्रमाचे आभार कु. श्रेया गव्हाणे या विद्यार्थ्यांनीने केले तर आभार कु. श्रावणी शेजवळ या विद्यार्थ्यांनींने केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

महाकाय वडाच्या झाडाने अडवले ओढ्याचे पात्र