सेवानिवृत्त जवान श्रीराम भोसले यांचा डाकवे परिवारातर्फे सत्कार

 


कराड/वार्ताहर

भारतीय सैन्यात शौर्याने देशसेवा बजावून आलेले जवान श्रीराम भोसले यांचा डाकवे परिवाराच्या वतीने अर्थपूर्ण आणि सन्माननीय भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. जवान श्रीराम भोसले यांना डाकवे परिवारातर्फे देशाच्या सर्वोच्च संविधानाची सुंदर फ्रेम, स्पंदन एक्सप्रेसचा विशेष अंक आणि सन्मानाचे प्रतीक असलेला ‘स्पंदन गमजा’ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सौ.रेश्मा डाकवे व भोसले कुटंबातील सदस्य उपस्थित होते.

या सत्कार सोहळ्याचे भावनिक वैशिष्ट्य म्हणजे, जवान श्रीराम भोसले यांच्या समोरच त्यांच्या नावाच्या अक्षरांचा वापर करून हुबेहूब ‘अक्षरगणेशा’ साकारण्यात आला. नावाच्या अक्षरांमधून श्रीगणेशाची ही अत्यंत सुंदर आणि मनमोहक कलाकृती प्रत्यक्ष साकारताना पाहून जवान भोसले व कुटूंबीय भावूक झाले. ही अनोखी कलाभेट अत्यंत संस्मरणीय क्षण ठरली. याप्रसंगी बोलताना डाकवे परिवाराच्या वतीने जवानांच्या त्यागाची आणि अहोरात्र केलेल्या समर्पणाची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणार्या जवानांमुळेच आपण देशात सुरक्षित आहोत, अशा वीर पुत्राचा सन्मान करण्याचे भाग्य लाभल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. 

जवानांसाठी राबवलेले उपक्रम :

एक दिवा जवानांसाठी, सॅल्युट कार्ड स्पर्धेचे आयोजन, फौजींना सुलेखनातून सलाम, एक अक्षरगणेशा हुतात्मा जवानांसाठी, कर्नल संतोष महाडीक यांचे हस्तलिखित, भारत के वीर खात्यात स्पर्धेचे शुल्क जमा, 75 स्वातंत्र्यसेनानीची स्केेचेस रेखाटून त्यांचे प्रदर्शन, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीज मध्ये निधी, 16 फुट पोस्टरच्या कॅलिग्राफीतून जवानांना सलाम, 75 स्वातंत्र्यसैनिकांच्या माहितीच्या हस्तलिखीताचे प्रकाशन, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5 हजाराची आर्थिक मदत

Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न